Karanzalem Land Scam Dainik Gomantak
गोवा

Karanzalem Land Scam: करंझाळे जमीन घोटाळा: 'ईडी'चे आरोपपत्र; पाचजणांवर कारवाई, बनावट कागदपत्रांद्वारे फसवणुकीचा आरोप

ED PMLA Chargesheet Goa: ‘ईडी’ने यापूर्वीच एक अंतरिम आदेश जारी करून या घोटाळ्याशी संबंधित २७.१० कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: करंझाळे येथील मौल्यवान जमिनीवरील कूळ हक्क बेकायदेशीररीत्या हडप केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत ‘प्रतिबंधात्मक पैसा गैरव्यवहार कायदा’ (पीएमएलए) अंतर्गत मेरशी येथील विशेष न्यायालयात पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील २७.१० कोटी रुपयांची मालमत्ता ही गुन्ह्यातून मिळालेली बेकायदेशीर कमाई असल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे.

आरोपपत्रात फादर अर्लिनो डिमेलो, फादर व्हिक्टर कॉन्साव रॉड्रिग्स, तत्कालीन भूमी अभिलेख निरीक्षक प्रभाकर रामा हवालदार आणि जमीन खरेदी करणाऱ्या खासगी रिअल इस्टेट कंपनीचा समावेश आहे. तपासानुसार, २००४ ते २००६ दरम्यान बनावट कागदपत्रांच्या आधारे २४७९ चौरस मीटर जमिनीच्या नोंदीत ‘आर्चडायसिस ऑफ गोवा अँड दमण’चे नाव बेकायदेशीरपणे समाविष्ट करण्यात आले.

त्यामुळे मूळ कूळ कुटुंबाला त्यांच्या हक्काच्या जमिनीपासून वंचित राहावे लागले. ‘ईडी’ने २०२५ मध्ये विविध ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले. तपासात संबंधित जमीन केवळ ६१.९७ लाख रुपयांना खासगी कंपनीला विकण्यात आल्याचे, त्यानंतर तेथे निवासी व व्यावसायिक प्रकल्प उभारून फ्लॅट व दुकाने विक्रीतून २७.१० कोटी रुपयांची कमाई झाल्याचे समोर आले.

२७.१० कोटींची मालमत्ता जप्त

‘ईडी’ने यापूर्वीच एक अंतरिम आदेश जारी करून या घोटाळ्याशी संबंधित २७.१० कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. यामध्ये करंझाळे येथील एका हॉटेल-कम-रेस्टॉरंट या व्यावसायिक इमारतीसह अन्य दोन स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. ‘ईडी’ने दाखल केलेले हे आरोपपत्र आता उत्तर गोव्यातील मेरशी येथील विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयासमोर पुढील सुनावणीसाठी प्रलंबित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT