E- Vehicles in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात ई- वाहनांच्या संख्येत मोठी वाढ

3542 वाहनांची नोंद : पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे पर्यायी इंधनाकडे कल

दैनिक गोमन्तक

पणजी : पेट्रोल आणि डिझेलचा वाढता दर आणि सरकारकडून दिले जाणारे अनुदान आदी कारणांमुळे राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढू लागली आहे. ई-वाहनांमध्ये प्रामुख्याने दुचाकींची खरेदी जास्‍त केली जात आहे.

आतापर्यंत 3542 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वाहन संकेत स्थळावरून मिळाली आहे.

प्राप्त माहितीनुसार राज्यातील जास्त इलेक्ट्रिक वाहने ही खासगी आहेत. त्यात व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 100 हून कमी असून यात 51 कदंब महामंडळाच्या बसेस आहेत.

या वर्षी जानेवारीपासून एकूण 2071 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी राज्यात झाली आहे. 2021 च्या तुलनेत ही दुप्पट असून गेल्या वर्षी एकूण 1094 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती. 2021 मध्ये नोंदणी झालेल्या एकूण 51 हजार वाहनांमध्ये 2.1 टक्के इलेक्ट्रिक वाहने होती. तर, 2022 मध्ये आतापर्यंत 28,239 वाहनांची नोंदणी झाली आहे, त्यात इलेक्ट्रिक 7 टक्के आहेत. 2020 मध्ये एकूण 42 हजार 427 वाहने नोंद झाली. परंतु, त्यापैकी फक्त 80 म्हणजे 0.1 टक्के ई वाहने नोंद झाली होती.

राज्यात 100 लोकांमागे 625 वाहने !

राज्यात प्रत्येक 100 लोकांमागे 625 वाहने नोंद आहेत. वाहन घनतेच्या बाबतीत गोवा जगात 15 व्या क्रमांकावर आहे.तर, ई वाहनांसाठी योजना नोव्हेंबर 2021 मध्ये अधिसूचित केली आहे. सरकार दरवर्षी तीन हजार दुचाकी, 50 तीन चाकी आणि 300 चारचाकी वाहनांसाठी अनुदान देत आहे. राज्यात नोंद झालेल्या वाहनांची एकूण संख्या 11 लाख 45 हजार 041 आहे. मे 2022 पर्यंत केवळ 486 इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली. होती. तर, 2285 दुचाकींची नोंदणी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT