Goa Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police: राज्यात 'या' तारखेपासून मिळणार ई-चलन - गुदिन्हो

पणजी, पर्वरी, मेरशी सर्कलवर स्मार्ट कॅमेरे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic Police राज्यातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रणात ठेवण्यासह नियमांचे उल्लंघन टाळण्यासाठी नवी अत्याधुनिक कॅमेरा यंत्रणा एक जूनपासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी गुरुवारी दिली.

यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावर होणारी दंडात्मक कारवाई यापुढे ई-चलनच्या माध्यमातून संबंधित वाहनधारकांवर होणार आहे. त्यामुळे यापुढे राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे अनिवार्य आहे.

एआय पॉवर्ड इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमकडून ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून त्यांच्याकडूनच संबंधित वाहनधारकांना ई-चलन पाठवण्यात येणार आहे. यातून जो महसूल मिळेल, त्यापैकी काही पैसे या कंपनीला मिळतील, तर उर्वरित महसूल सरकारला मिळणार आहे.

ई-चलन आणि एसएमएसही

बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. या कॅमेराद्वारे वाहतुकीचे निरीक्षण करून त्यात नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांच्या मोबाईलवर हे ई-चलन पाठवण्यात येईल.

सोबत एसएमएसही पाठवण्यात येईल. हा दंड भरण्यासाठी वाहनधारकाला वाहतूक विभाग किंवा पोलिसांच्या वाहतूक शाखेची मदत घ्यावी लागेल, असेही वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.

या नव्या प्रणालीतील सीसीटीव्ही कॅमेरे 1 जूनपासून कार्यान्वित केले जातील. ही अत्याधुनिक यंत्रणा सध्या जरी सज्ज असली तरी लोकांमध्ये त्याविषयी जनजागृती व्हावी आणि यासाठी पुरेसा अवधी मिळावा म्हणून ही यंत्रणा 1 जूनपासून सुरू करण्यात येत आहे. पणजी, पर्वरी आणि मेरशी सर्कलवर हे स्मार्ट कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

- माविन गुदिन्हो, वाहतूकमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT