Say No to Drugs Dainik Gomantak
गोवा

Say No To Drugs: अमली पदार्थाविरुद्ध कारवाईचा वेग वाढणार; पोलिसांनी सुरु केली 'ही' मोहिम

दैनिक गोमन्तक

गोवा पोलिसांनी राज्य प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार अमली पदार्थविरोधात कारवाई सुरु ठेवली आहे. अशा कारवाईत प्रतिमहिना सरासरी 45 किलो अमली पदार्थ जप्त केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज दक्षिण गोव्याचे पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी हणजूण येथे हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेत "Say No to Drugs" मोहिम सुरु केल्याची माहिती दिली.

(DySP Jivba Dalvi holds meeting with restaurants and pub owners and managers at Anjuna)

मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण गोवा पोलिसांनी हणजूण येथे पब मालक आणि व्यवस्थापकांची आज बैठक घेतली. या बैठकीत पोलिसांनी अमली पदार्थविरुद्धच्या कारवाईत स्थानिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. असे प्रकार मोडीत काढण्यासाठी केवळ कारवाई नाही. तर स्थानिकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी "से नो टू ड्रग्स" मोहिमेतद्वारे पोस्टर देत जागृतीसाठी आवाहन केले. तसेच अमली पदार्थ सेवनाविरुद्ध स्थानिक नागरीकांची जागृती करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

महिन्याला सरासरी 45 किलो अमली पदार्थ जप्त

या पार्श्वभूमीवर दिनांक 29 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वलसान यांनी गोव्यात अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांमध्ये स्थानिकांचा समावेश असल्याचे समोर येत आहे. असे म्हटले आहे. अशा स्थानिकांना आता न्यायालयात उभा करणार असल्याचे म्हटले आहे.

पोलिस दल महिन्याला सरासरी 45 किलो अमली पदार्थ जप्त करते आहे. यासाठी अधिकाऱ्यांशी योग्य त्या सुचना देण्यात आल्या आहेत. असे ही त्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यात आता अमली पदार्थविरुद्धच्या कारवाईला वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT