Nidhin Valsan
Nidhin ValsanDainik Gomantak

Goa police In Action Mode: गोव्यात महिन्याला 45 किलो अमली पदार्थ जप्त; ''आता स्थानिक तस्करांना न्यायालयात उभे करणार''

उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी दिला इशारा
Published on

गोवा राज्यातील अमली पदार्थ तस्करी मोडीत काढण्यासाठी पोलिस दलाने शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी पोलीस दलाने अमली पदार्थांविरोधातील कारवाई सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वलसान यांनी गोव्यात अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे आज म्हटले आहे.

(SP Nidhin Valsan inform Goans have been supplying drugs )

पोलीस अधीक्षक निधीन वलसान म्हणाले की, गोव्यातील काही स्थानिकच अमली पदार्थ पुरवठा करत आहेत तसेच अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेले असल्याचे आता समोर येत आहे. त्यांची ओळख पट न्यायालयात समोर उभे करु असे त्यांनी म्हटले आहे.

Nidhin Valsan
Climate Change: वातावरण बदलामुळे गोवेकर हैराण, 'असे' आहे गोव्याचे हवामान

वलसान यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस दल महिन्याला सरासरी 45 किलो अमली पदार्थ जप्त करते आहे. यासाठी अधिकाऱ्यांशी योग्य त्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकारी योग्य ती कारवाई आता करणारच असे त्यांनी म्हटले आहे.

Nidhin Valsan
Mopa Airport: कधी होणार 'मोपा'वरुन विमान उड्डाण? नवी अपडेट आली समोर

अधीक्षक म्हणाले की, आता नवीन वर्ष सुरु होणार आहे यातच पर्यटन हंगामात सुरु आहे. त्यामुळे राज्याच्या सीमांवर तपासणी सुरु केली आहे. जेणेकरुन अमली पदार्थ राज्यात येणार नाहीत. अथवा त्यांच्यवार चाफ बसेल या उद्देशाने तपासणी सुरु केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पोलिस दल नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच कामाला लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com