Durgadas Kamat | Goa Forward Party Dainik Gomantak
गोवा

Goa Forward Party: मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून ‘त्या’ नाटकाला मनाई!

गोवा फॉरवर्ड : ‘काणी नव्या युगाची’ला त्यांनीच आधी दिली होती परवानगी

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Forward Party: राष्ट्रीय शिक्षण धोरणावर आधारित निर्मिलेल्या ‘काणी नव्या युगाची’ या नाटकासाठी मुख्यमंत्र्यांनीच संमती दिली होती. मात्र, विर्डी येथे झालेल्या ‘म्हादई बचाव’ सभेत राजदीप नाईक हे सहभागी झाल्याने त्यांच्या नाटकाचे दोन शो झाल्यानंतर दिलेली संमती मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच मागे घेतली.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा गोवा फॉरवर्डने निषेध केला आहे. सरकार विरोधात आवाज उठविणाऱ्यांवर सूड उगवण्यात येत असल्याचा आरोप दुर्गादास कामत यांनी केला. पणजीतील गोवा फॉरवर्डच्या कार्यालयात सरचिटणीस कामत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला कलाकार राजदीप नाईक उपस्थित होते.

कामत म्हणाले, सरकारविरोधात आवाज उठवल्यास साहित्यिक, कलाकारांना केलेली मदत मागे घेत त्यांचा छळ केला जात आहे. राजदीप यांनी विर्डी येथे झालेल्या ‘म्हादई बचाव’ सभेच्या आदल्या दिवशी म्हादई विषयावर एक व्हिडिओ काढला होता.

त्यात त्यांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नाटकांचे 12 शो करण्यास दिलेली परवानगी मागे घेतली. यासंदर्भातील माहिती नाईक यांनी माहिती हक्क कायद्याच्या आधारे घेतली.

माहिती व प्रसिद्धी खात्याने फाईलवर केलेल्या टिप्पणीनुसार, हे शो मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मागे घेतल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत हे सरकारविरोधात बोलणाऱ्यांची अशाप्रकारे तोंड बंद करत आहे, अशी टीका कामत यांनी केली.

...तरीही सरकारविरोधात आवाज उठवू

यापूर्वी काँग्रेसविरोधात अनेक नाटकांतून मुद्दे मांडले होते, तेव्हा हेच भाजपचे नेते स्तुती करायचे. मात्र, सत्तेवर आल्यावर त्यांनी भूमिका बदलली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात निर्मिलेल्या ‘काणी नव्या युगाची’ नाटकासाठी सरकारचा पाठिंबा घेतला.

यात सरकारविरोधी किंवा आक्षेपार्ह काही असल्यास तक्रार करण्याचे आव्हान राजदीप नाईक यांनी दिले आहे. जरी नाटकाचे कंत्राट मागे घेतले, तरी सरकारच्या चुकांवर आवाज उठवणार असल्याचे नाईक यांनी ठासून सांगितले.

नाटकाची प्रशंसा, तरीही कंत्राट मागे

कामत म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघातच या नाटकाचा पहिला शो झाला. त्यावेळी उपस्थित शिक्षणतज्ज्ञ तसेच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनीही हे नाटक चांगले असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर धारबांदोडा येथे नाटक झाले.

मात्र, हळर्ण येथील नाटकादिवशी माहिती व प्रसिद्धी खात्याने त्यांना दिलेले कंत्राट मागे घेतल्याचे कळविले. ओमकार नागवेकर यांनी या नाटकाला आक्षेप असल्याची तक्रार ई-मेलद्वारे केल्याचे स्पष्टीकरण दिले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

Omkar Elephant: 'ओंकार'चा उगवे भागात धुमाकूळ, संतप्त नागरिकांकडून सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT