Dupatta Serial Killer Mahanand Naik Goa Family Wife's Exclusive comment Dainik Gomantak
गोवा

'तो आमच्यासाठी कधीच मेला', 14 वर्षानंतर बाहेर आलेल्या दुपट्टा किलरची बायको महानंदबद्दल काय म्हणाली?

दुपट्टा किलरच्या पत्नीला महानंदच्या बाहेर येण्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता तिने 'तो आपल्यासाठी कधीच मेला' अशी थेट प्रतिक्रिया दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mahanand Naik Goa: गोव्यात तब्बल सोळा महिलांची हत्या केलेला दुपट्टा किलर महानंद नाईक मागील 14 वर्षापासून कोलवाळ कारागृहात शिक्षा भोगत आहे. दरम्यान, मागील आठवड्यात त्याला फर्लो रजा मंजूर झाल्यानंतर तो कारागृहातून बाहेर आला आहे.

ओल्ड गोवा पोलिस ठाण्यात तो एक दिवस आड हजेरी लावत आहे. महानंद बाहेर आल्यानंतर त्याने केलेल्या अमानवी कुकृत्यांच्या आठवणी ताज्या होऊ लागल्या आहेत. दुपट्टा किलरच्या पत्नीला महानंदच्या बाहेर येण्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता तिने 'तो आपल्यासाठी कधीच मेला' अशी थेट प्रतिक्रिया दिली आहे.

महानंद नाईक बाहेर आल्यानंतर त्याबाबत प्रितिक्रिया विचारण्यासाठी त्याच्या पत्नीला 'गोमन्तक'कडून संपर्क साधण्यात आला.

'महानंद बाबत मला काहीच माहिती नाही. तो केव्हा बाहेर आला, कुठे आहे याबाबत मला काही कल्पना नाही.' मुलगीबाबत विचारले असता, तिला देखील काही माहिती नाही. 'तो आमच्यासाठी कधीच मेला आहे.' अशी प्रतिक्रिया महानंदच्या पत्नीने गोमन्तक टिव्हीच्या प्रतिनिधी वर्षा आश्वेकर यांच्याशी बोलताना दिली.

महानंद बाबत त्याच्या पत्नीने अधिक काही न बोलता तो केव्हाच त्यांच्यासाठी मेला असल्याचे म्हटले आहे.

महानंद नाईकला फर्लो मिळण्यासाठी प्रयत्न करणारे पाद्री यांना संपर्क केला त्यांनी महानंदच्या फर्लो आणि उद्देशाबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला.

'महानंद सुट्टीवर आहे तोवर त्याबद्दल काहीही प्रतिक्रिया देणार नाही. तो पुन्हा माघारी जाईल त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देणार,' असे संपर्क केलेल्या एका पाद्रींने गोमन्तक टिव्हीशी बोलताना सांगितले.

१९९४ ते २००९ अशी १५ वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत दुष्कर्म करत राहिला. लहानशा गोव्यात महानंदची दहशत निर्माण झाली होती आणि पोलिसांपुढे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते.

या तपासाची संपूर्ण माहिती महानंद नाईक प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी सी.एल. पाटील यांनी दिली आहे. त्याची सविस्तर मुलाखत खाली पाहू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज, दामू बाबूंशी काय बोलले?

Shivling Waterfall: नो टेन्शन, फक्त एन्जॉय! पालीच्या शिवलिंग धबधब्यावर सुरक्षित पर्यटनासाठी वनखात्याची विशेष व्यवस्था

Goa Education: कुठल्याही वयात द्या परीक्षा, नापास होण्याची भीती कायमची मिटली; काय आहे 'सरकारची खासगी विद्यार्थी योजना'?

Goa Live News: 'जनता दरबार'ला प्रतिसाद..!

Heavy Rain In Margaon: मुसळधार पावसाने मडगावला झोडपले, गांधी मार्केटात पाणी; पालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT