Mahanand Naik Dainik Gomantak
गोवा

Dupatta Serial Killer महानंद नाईक प्रकरण; अखेर पिडित महिलेला पोलिसांचे संरक्षण

पीडितेने संरक्षण देण्याची मागणी पोलिसांकडे पत्राद्वारे केली होती

Rajat Sawant

दुपट्टा किलर महानंद नाईक याला 21 दिवसांचा फर्लोर मंजूर केल्याने तो कारागृहाबाहेर येणार आहे. या काळात तो बदला घेण्याची शक्यता असल्याने संरक्षण देण्याचा अर्ज बलात्कार प्रकरणातील पीडितेने पोलिसांकडे पत्राद्वारे केला होता.

दरम्यान, पीडित महिलेच्या अर्जाची दखल घेत अखेर महिलेला पोलिसांनी संरक्षण दिले आहे.

दुपट्टा किलर महानंद नाईक याच्यावर 16 तरुणींची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यापैकी दोन प्रकरणात त्याला जन्मठेपेची तर एका बलात्कार प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासूनच तो कारागृहात आहे.

महानंद हा गरीब महिलांना हेरून त्यांच्याशी ओळख करत होता. त्यानंतर त्या महिलेला विवाहाचे आमिष दाखवून पळून जाऊन विवाह करू, असे सांगायचा. येताना या महिलांना तो दागिने घेऊन येण्यास सांगत असे. त्यांना निर्जनस्थळी नेऊन दुपट्‍ट्याने तो गळा आवळून त्यांचा खून करत असे. अंगावरील दागिने काढून मृतदेह निर्जनस्थळी टाकून देत असे.

महानंद कारागृहातून बाहेर आल्याने पिडीत महिलेने 'माझ्या जिवाला धोका आहे'. मला संरक्षण द्या अशी विनंती तिने पोलिसांना पत्र लिहून केली होती. दरम्यान अर्जाची दखल घेत महिलेला संरक्षण दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Juje Konkani Movie: जगभर पुरस्कार, गोव्यात मात्र ‘क' वर्ग; ‘जुझे’ सिनेमाच्या श्रेणीवरून नाराजी; ‘ईएसजी'कडून गळचेपीचा दावा

Taxi Driver Assault: गोवा माईल्‍सच्‍या चालकाला मारहाण! टॅक्‍सीचालकांची दादागिरी; पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल

Goa: ..रुक जाना नहीं तू कहीं हारके! 1104 अर्ज करूनही नोकरी नाही, पदवीधर 'विठोबा' बनला मेकॅनिकचा हेल्पर

'गोव्यात गुंडाराज चालू देणार नाही'; रामा काणकोणकरांच्या न्यायासाठी विजय सरदेसाईंचे आझाद मैदानात आंदोलन

Vasco: वास्कोतील कचरा पाठवणार काकोड्यात! मुरगाव पालिकेचा निर्णय; सरकारला करणार विशेष अनुदानाची विनंती

SCROLL FOR NEXT