Goa Mining | Mining in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: कमी दर्जाच्या लोह खनिजाबाबत महिना अखेरपर्यंत 'डंप हँडलिंग पॉलिसी 2023'; राज्य सरकारची माहिती

ई-लिलावात प्रदुषणास कारणीभूत ठरणाऱ्या डंप्सना प्राधान्य

Akshay Nirmale

Goa Government on Pollution of Iron Ore: ई-लिलावाच्या माध्यमातून कनिष्ठ दर्जाचे लोह खनिज हाताळण्यासाठी नवीन डंपिंग हँडलिंग पॉलिसी 2023 मध्ये ठराविक डंप्सना प्राधान्य दिले जाऊ शकते.

यात आजुबाजूच्या परिसराच्या प्रदुषणाला कारणीभूत ठरणारे, डोंगर उतारावरील, वन क्षेत्रातील तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील भागातील डंप्सचा समावेश असू शकतो.

खाण आणि भूविज्ञान संचालनालयाकडून या धोरणाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकार जून अखेरीस ते अधिसूचित करण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी सांगितले की, जे डंप स्थिर आहेत, वनस्पतींचे आच्छादन असलेले आहेत, भाडेतत्त्वावर असलेल्या आणि आजूबाजूच्या परिसंस्थेच्या ऱ्हासाला हातभार न लावलेल्या डंप्सना विद्यमान धातू संपल्यानंतरच खाणकामासाठी परवानगी दिली जाऊ शकते. हाताळणीसाठी देखील मंजुरी लागेल.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच लवकरच डंप मायनिंग धोरण आणू, असे सांगितले आहे.

राज्य सरकार राज्यभरात डंपची ओळख पटवत आहे. मसुदा धोरणाला अंतिम रूप दिल्यानंतर मंजुरीसाठी पाठवले जाईल. अंतिम धोरणाला मंजुरीसाठी मंत्रीमंडळासमोर ठेवले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

डिसेंबरमध्ये, SC ने निम्न-दर्जाच्या लोहखनिज डंपवर निर्णय घेण्याची परवानगी दिली होती. सुमारे 20 दशलक्ष टन लोह खनिज कचऱ्याच्या स्वरूपात पडून आहे.

चार ते पाच वर्षांच्या कालावधीत त्याची निर्यात केली जाऊ शकते, असा अंदाज राज्याच्या खाण विभागाने व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT