Tilari Dam  Dainik Gomantak
गोवा

Goa Water Issue: पाण्याचे शुक्लकाष्ठ संपता संपेना...

Goa Water Issue: तिळारीचा कालवा पूर्ववत नाहीच: पर्वरी, साळगावात पाण्यासाठी वणवण सुरूच

दैनिक गोमन्तक

Goa Water Issue: तिळारी धरणाच्या कालव्याच्या दुरुस्ती कामामुळे मध्यंतरी महिनाभर पर्वरी व साळगावमधील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड वणवण करावी लागली. अलीकडेच कालव्याची दुरुस्ती करून तिळारीचे पाणी गोव्याला सोडले, पण चार दिवसांतच पुन्हा महाराष्ट्राच्या बाजूने कालव्यास भगदाड पडल्याने पाणीपुरवठा पुन्हा बंद करण्यात आला.

त्यामुळे पर्वरी व साळगाववासीयांचे पाण्याचे शुक्लकाष्ठ सध्यातरी संपण्याचे नाव घेत नाही असेच दिसते.

महाराष्ट्राच्या हद्दीतील तिळारी धरणाच्या कालव्याला भगदाड पडून सुरू झालेली गळती दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याचा दावा जलस्त्रोतमंत्र्यांनी केला होता, परंतु हा दावा फोल ठरला आहे. कालव्याच्या गळतीमुळे 31 डिसेंबरपासून पाणीपुरवठा बंद झाला आहे.

आता ही गळती थांबवून पर्वरी व साळगावमध्ये पाणी पोचण्यास स्थानिकांना बुधवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

‘हर घर जल’च्या केवळ बाताच

सरकार तसेच मंत्री ‘हर घर जल’च्या फक्त बाताच मारतात. एकीकडे मंत्र्यांनी पाणी पूर्ववत केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात पर्वरीला सोमवारी पाणीपुरवठा झाला नाही. मी स्वत: तेथील प्रकल्पस्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर प्रकल्पात एक थेंबही पाणी नसल्याचे वास्तव्य लक्षात आले, अशी माहिती आल्त-तोरडामधील स्थानिकाने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस 'झेडपी' निवडणुकीबाबत गंभीर आहे?

Rohit Sharma: 'बूम बूम' आफ्रिदीचा विक्रम विक्रम उद्ध्वस्त होणार? 'हिटमॅन' रोहित शर्मा बनणार 'सिक्सर किंग', फक्त 'इतक्या' षटकारांची गरज

SCROLL FOR NEXT