Kadamba Transport Dainik Gomantak
गोवा

Kadamba Transport : नोकरदारांचे बिघडते कामाचे वेळापत्रक; शटल बसची कमतरता

राज्य सरकारने उपाययोजना करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

कदंब महामंडळाच्या शटल बसेसच्या कमतरतेमुळे मडगाव-पणजी मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर यांनी महामंडळाला 100 बसेसचा तुटवडा भासत असल्याची माहिती दिली असली तरी या बसेसची सेवा अजून सुरू झाली नसल्याने मडगाव बसस्थानकावर दररोज प्रवाशांच्या रांगा लागत आहेत.

राज्यअंतर्गत प्रमुख मार्गावर प्रवाशांना जलद सेवा देण्यासाठी शटल बससेवा आहे. दक्षिण गोव्यातील अनेक सरकारी व बिगरसरकारी कर्मचारी आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी मडगाव बसस्थानकावर येतात. मात्र, त्यांना कदंबच्या शटल बसेस उपलब्ध नसल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बस वेळेवर नाही

दररोज शटल बसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, मागील एक महिन्यापासून कधीच बस वेळेवर मिळत नाही. त्यामुळे ऑफिसला पोहोचायलाही उशीर होत आहे. कामावर वेळेवर न पोहोचल्याने वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. हे किती दिवस चालणार याची शाश्‍वती नाही.

"काणकोणवरून पर्वरी येथे कामाला येण्यासाठी सकाळी ७ वाजता निवासस्थानाहून निघते. ८ ते ८.२५ वा.दरम्यान मडगावला पोहोचते. त्यावेळी शटल बसने प्रवास करण्यासाठी मडगाव ते पणजी मार्गावर प्रवाशांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे माझा क्रमांक येईपर्यंत ३० ते ४० मिनिटे वाया जातात."

- दीपा गावकर, काणकोण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT