short circuit causes fire at davorlim Dainik Gomantak
गोवा

Davorlim Fire: दवर्लीत रायकर यांच्या घराला भीषण आग, जीवीतहानी टळली; लाखोंचे नुकसान!

Davorlim Fire: दवर्ली पंचायतीजवळ असलेल्या रायकर यांच्या घराला सोमवारी सकाळी (19 ऑगस्ट) आग लागली.

Manish Jadhav

Short Circuit Causes Fire At Davorlim

दवर्ली पंचायतीजवळ असलेल्या रायकर यांच्या घराला सोमवारी सकाळी (19 ऑगस्ट) भीष आग लागली. दरम्यान अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सव्वासात वाजता तेरेझा रायकर यांच्या घराच्या वरच्या बाजूला टेरेसवरील रुमला आग लागली. यावेळी रायकर कुटुंबीय मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी करत असताना घराच्या वरच्या बाजूला असलेल्य‍ा भागाला आग लागलेली दिसून आली. त्यांनी घरातील वीज तात्काळ बंद केली. याचवेळी घराच्या वरील भागातून स्फोट झाल्याचा मोठा आवाज आला व तेथील सामानाने पेट घेतला. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, या आगीत सदर खोलीतील वॉशिंग मशिन, मुलांचे अभ्यासाचे साहित्य, उभारलेली शेड व इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. तेरेझा रायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वीच टेरेसवर शेडचे बांधकाम करत नव्याने वीजवाहिनीची जोडणी करण्यात आली होती. यात सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त नुकसान झालेले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. अग्निशामक दलाने अद्याप अंदाजपत्रक तयार केलेले नाही. घटनेची माहिती मिळताच मायना कुडतरी (Maina Curtorim) पोलिसही घटनास्थळी पोहोचले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT