Dudhsagar Waterfall Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Waterfall: दुसऱ्या दिवशीही दूधसागर गाईड्सचे आंदोलन सुरूच; अजून मागण्‍यांची दखल नाहीच

Dudhsagar Waterfall Entry Fee: कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्‍यात आला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

कुळे: कुळे दूधसागर धबधब्‍याच्‍या ठिकाणी ट्रेकिंगद्वारे पर्यटकांना नेऊन आणण्‍यासाठी गाईड्स नियुक्त आहेत. परंतु जीटीडीसी व गोवा वन विकास महामंडळाने लावलेल्‍या अनाठायी शुल्‍कामुळे काल १७ ऑगस्टपासून येथील गाईड्स आपल्या मागण्या घेऊन आंदोलन करत आहेत. आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस होता.

गाईड्‌सच्‍या मागण्‍यांची अजूनपर्यंत कोणीच दखल घेतलेली नाही. संबंधित खात्यांचे अधिकारी व जीटीडीसीचे चेअरमन आमदार डॉ. गणेश गावकर यांनी आमचा प्रश्‍‍न सोडवावा अशी मागणी त्‍यांनी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्‍यात आला आहे.

गाईड्‌सच्या प्रमुख मागण्या

वन खात्याने सकाळी ८ ते १० या वेळेत प्रवेश निश्‍चित केला आहे, तो सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत करून पर्यटकांना घेऊन जाण्यास परवानगी द्यावी.

गोवा पर्यटन विकास महामंडळ व गोवा वन विकास महामंडळ यांनी लावलेला कर मागे घ्यावा.

एका गाईडला ८ जण पर्यटक नेण्यास परवानगी आहे, ती १० करावी.

पर्यटकांना चेंजिंग रुम तसेच शौचालयाची सुविधा उपलब्‍ध करून द्यावी.

रेल्वेतून येणारे पर्यटक सोनावळी येथे उतरतात. रेलमार्गे धबधब्‍याकडे जाणाऱ्या पर्यटकांना आवर घालावा.

पावसाळा सुरु झाल्यानंतर लगेच ट्रेकिंग सुरू करणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT