Dudhsagar river news Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar River: "न्हांवपाक आयल्यार बडयतले!" ग्रामस्थांचा संतप्त पवित्रा; दूधसागर नदीवर आंघोळीसाठी येणाऱ्यांना इशारा

पर्यटकांना फोंडा पोलीस व स्थानीक लोकांनी हाकलून लावले होते मात्र तरीही पर्यटक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने हा निर्णय घेण्यात आलाय

Akshata Chhatre

धारबांदोडा: ओकांब- धारबांदोडा येथील दूधसागर नदीवर अंघोळीसाठी आलेल्या लोकांना रविवारी (दि.४) स्थानिक लोकांनी पोलिसांच्या सहकार्याने हाकलून लावले आणि यापुढे नदीवर आंघोळसाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनांचा टायर पंचर करण्याचा तसेच मारहाण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वी ओकांब - धारबांदोडा येथील दूधसागर नदीवर आंघोळीसाठी आलेल्या पर्यटकांना फोंडा पोलीस व स्थानीक लोकांनी हाकलून लावले होते मात्र तरीही पर्यटक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. धारबांदोडा तालुक्याचे जिल्हाधिकारी निलेश धायगुडकर यांनी नदीवर अंघोळीसाठी येणाऱ्या लोकांना अडवण्यासाठी आणि परिस्थितीतवर नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गस्त वाढवण्याचे आदेश दिला होता. पोलीस जेवायला गेलेले असताना नदीच्या किनाऱ्यावर आलेल्या जवळपास ५० पर्यटकांना ग्रामस्थांनी हाकलवून लावले आहे.

नदीत बुडून मृत्यू होण्याची प्रकरणे भरपूर आहेत आणि आणखीन असे मृत्यू होऊ नयेत म्हणून पोलीस तसेच स्थानिक कार्यरत आहेत, मात्र पर्यटक पोलिसांच्या सूचना ऐकण्याच्या तयारीत नसतात, मनमानी करतात आणि हेच रोखण्यासाठी आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतलीये.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे पर्यटक गाडीच्या डिकीमध्ये दारूच्या बाटल्या भरून घेऊन येतात. गेट बंद असल्यास देखील त्याला जुमानत नाहीत आणि स्वतःची मनमानी करतात. दूधसागर नदीवर अंघोळीसाठी आलेल्या काही पर्यटकांचा बुडून मृत्यू झालाय आणि अशा आणखीन दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून स्थानिकांनी कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय.

वाढदिवस ठरला शेवटचा दिवस

काही दिवसांपूर्वी काणकोण येथून आलेला एक तरुण याच ठिकाणो मृत्यू पावला. मित्रांसह वाढदिवस साजरा करायला आलेल्या या युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. असे आणखीन अपघात घडू नयेत म्हणून पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात निवडणुकीचे पडघम! दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोणाची लागणार लॉटरी?

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणात ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Goa Govrnment Jobs: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! विधानसभा निवडणुकीआधी नोकऱ्यांचा पाऊस; मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

सॅम्युअल मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिस अधीक्षकांनी नोंदवले ब्रागांझा कुटुंबीयांचे जबाव, पोलिसांच्या कारवाईवर आमदार फेरेरांचे आक्षेप

Mala Lake Fish Death: मळा तलावातील माशांचा रहस्यमय मृत्यू! उच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर 32 घरांना बसला सांडपाणी जोडणीचा वेढा

SCROLL FOR NEXT