Dudhsagar Kulem Jeep Tour Association Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Tourism: 'आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा सर्व जीप ऑफलाईन सोडणार'! कुळे जीप असोसिएशनचा इशारा

Kulem Jeep Tour Association: आता दोन वर्ष झाली मात्र समस्या सुटलेल्या नाहीत. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, असे दूधसागर जीप टूर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Sameer Panditrao

फोंडा: गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) केलेला करार रद्द करुन आमची ऑनलाईन वेबसाईट आम्हाला परत द्यावी. २ ऑक्टोबरपूर्वी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही २ ऑक्टोबरपासून सर्व जीप ऑफलाईन सोडणार, असा इशारा जीप टूर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश वेळीप यांनी दिला आहे. कुळे जीप असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेतही तसा ठरावही मंजुर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

‘जीटीडीसी’ अंतर्गत जीप व्यवसायाशी जो करार केला आहे, त्या करारनुसार आमची पूर्वीची वेबसाईट घेऊन आम्हाला फसविले आहे. त्यामुळे आम्हाला ते मान्य नाही. यासाठी आम्ही एकत्रितपणे निर्णय घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे आमच्या समस्या मांडल्या.

आता दोन वर्ष झाली मात्र समस्या सुटलेल्या नाहीत. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, असे दूधसागर जीप टूर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. वेळीप म्हणाले की, २ ऑक्टोबरपासून दूधसागर पर्यटन व्यवसाय चालू होणार आहे. त्यापूर्वी आमच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात. अन्यथा आम्ही ऑफलाईन गाड्या सोडण्याचा निर्णय घेणार आहोत.

दरम्यान, जीप टूर असोसिएशनचा हा प्रश्‍न अनेक महिन्यापासून प्रलंबित आहे. आपल्याला नुकसान होत असून त्याची भरपाई कोण देणार असा प्रश्‍न आजच्या बैठकीत संघटनेतील काही सदस्यांनी उपस्थित केला.

आश्वासनानंतर आंदोलन घेतले होते मागे

दूधसागर जीप असोसिएशनने ज्यावेळी आंदोलन केले होते त्यावेळी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी गणेश चतुर्थीपुर्वी दूधसागर असोसिएशनचा प्रश्न मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करून मार्गी लावणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या आश्वासनामुळे असोसिएशनच्या पदाधिकारी आंदोलन मागे घेतले होते परंतु, मागण्या अजूनही पूर्ण न झाल्याने पदाधिकारी व जीप सदस्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. आजच्या बैठकीत तसा संताप व्यक्त करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT