Dudhsagar Jeep Election Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Jeep Election: जीप असोसिएशनच्या निवडणुकीत नीलेश वेळीप यांचा डंका, दिलीप मायरेकर आणि मयूर मराठेही विजयी; नव्या नेतृत्वाला कौल!

Goa Tourism Association: दूधसागर जीप असोसिएशनच्या निवडणुकीत सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: दूधसागर जीप असोसिएशनच्या निवडणुकीत सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. पार पडलेल्या या निवडणुकीत एकूण ४३१ सदस्यांपैकी ३९६ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीनंतर विविध उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत नीलेश वेळीप यांनी सर्वाधिक ३०१ मते मिळवत आघाडी घेतली.

त्यांच्यासोबत दिलीप मायरेकर यांना २८४ मते, मयूर मराठे यांना २४२ मते, बेनी अझावेदो यांना २३६ मते, यांना नंदेश देसाई यांना २२९ मते आणि सतीश सातपालकर यांना २१५ मते मिळाली, तसेच अतानियो सौझा यांना १८३ मते, अतानियो पॉल मास्कारेन्स १७२ मते आणि राजीव खांडेपारकर यांना १७० मते मिळाल्याने त्यांचीही निवड निश्चित झाली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. दूधसागर पर्यटनाशी संबंधित जीप व्यवसायात या असोसिएशनची भूमिका महत्वाची मानली जात असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगांरुची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

Goa Building Rule: गोव्यात अवघ्या 3 मीटर रस्त्यावर बांधकामांना परवानगी? 2023च्या सुधारित नियमांना न्यायालयात आव्हान; सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT