Vegetable Price In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Vegetable Prices: 15 रुपयांना एक शेवग्याची शेंग, 100 ला जुडी; कांदा, बटाटा व टोमॅटो किती महाग? वाचा बाजारभाव

Goa Vegetable Market Latest Prices: नाताळ, नववर्षारंभासाठी, विविध पार्ट्यांसाठी भाजीला मागणी असल्याने दर चढेच राहणार असल्याचे विक्रेते सांगतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Vegetable Prices

पणजी: राज्यात मागील काही महिन्यांपासून भाजीपाला आणि कडधान्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून शेवग्याच्या शेंगा बाजारात आणणे विक्रेत्यांनी बंद केले होते. त्यावेळी घाऊक बाजारात ३०० रुपये किलो दराने त्या विकल्या जात होत्या; परंतु आता १०० रुपये प्रतिजुडी दराने शेवग्याच्या शेंगा पणजी बाजारात विकल्या जात आहेत.

या शेवग्याच्या शेंगा सर्व भाजी विक्रेत्यांकडे उपलब्ध नाहीत. काही मोजकेच भाजी विक्रेते त्या विकत आहेत. लहान विक्रेत्यांना शेवग्याच्या शेंगा आणून विकणे परवडत नाही. त्यामुळे आम्ही शेवग्याच्या शेंगा विक्रीसाठी आणणेच टाळत असल्याचे भाजी विक्रेते सांगतात. शेवग्याच्या शेंगांच्या एका जुडीत सर्वसाधारण लहान-मोठ्या ६ ते ७ शेंगा असतात, त्यामुळे सर्वसामान्यपणे चौदा ते पंधरा रुपयांना एक शेंग विकली जात आहे.

दरम्यान, राज्यात कांदा, बटाटा व टोमॅटो आता ५० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. लसूण ४०० रुपये प्रतिकिलो आहे. त्यातही नाताळ, नववर्षारंभासाठी, विविध पार्ट्यांसाठी भाजीला मागणी असल्याने दर चढेच राहणार असल्याचे विक्रेते सांगतात.

आरोग्यासाठी गुणकारी

शेवग्याच्या शेंगा या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असल्याने त्यांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. शाकाहार आणि मांसाहार अशा दोन्ही पदार्थांमध्ये या शेंगांचा वापर होतो. आरोग्यासाठी गुणकारी असल्याने शेंगांना मागणी असते; परंतु आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील महिन्यानंतरच शेवग्याची शेंग बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, असे विक्रेते सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT