police arrested a drug smuggler in marcel goa Dainik Gomantak
गोवा

माशेलात दीड लाखांचा गांजा जप्त, परप्रांतीय तरुण अटकेत

फोंडा पोलिसांची धडक कारवाई, राज्यात अमली पदार्थांच्या तस्करीत मोठी वाढ

दैनिक गोमन्तक

फोंडा : राज्यात ठिकठिकाणी अमली पदार्थांची तस्करी होत असतानाच माशेलात एका तरुणाला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सूरज साह असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

फोंडा (Ponda) पोलिसांनी माशेल येथील जुन्या बसस्थानक परिसरात छापा टाकला. पोलिसांना मिळालेल्या टीपनुसार छापा टाकून सूरज उर्फ रामप्रताप साह (कुंभारजुवे, मूळ बिहार) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे 1.30 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या तरुणाकडे गांजा कुठून आला, त्याच्यासोबत त्याचे साथीदार कोण आहेत या गोष्टींचा तपास पोलिसांनी (Police) सुरु केला आहे. गोव्यात पर्यटकांची संख्या वाढतानाच आता अमली पदार्थांच्या तस्करीतही मोठी वाढ झाली आहे.

क्राईम ब्रँचने 30 मार्च रोजी रात्री मडगाव आणि वेर्णा या दोन ठिकाणी मोठी कारवाई केली. या कारवाईत उत्तर प्रदेशमधील दोघा संशययितांना अटक करण्यात आली. तर त्यांच्याकडून 8.58 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. तर 24 फेब्रुवारी रोजी मडगाव (Madgaon) परिसरात छापा टाकून रियाझ शेख (37, नावेली) याला अटक करुन आरोपीकडून 4 लाखांचा 4 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. तसंच 30 जानेवारी रोजी सांगोल्डा येथे पोलिसांनी छापा टाकून भरत कृष्णा (25, आंध्रप्रदेश) यास अटक केली. त्याच्याकडून जवळपास 7.5 लाखांचा साडे सात किलो गांजा जप्त केला होता. तर वास्को पोलिसांनी 25 जानेवारी रोजी एक किलो 21 ग्रॅम गांजा जप्त केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT