Calangute Baga Beach Dainik Gomantak
गोवा

बीचवरील मद्यपानामुळे लाईफगार्ड्सच्या डोक्याला ताप

रस्त्यांवरही मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने गोव्यात अपघातांमध्ये मोठी वाढ

दैनिक गोमन्तक

कळंगुट : होळीनिमित्त गोव्यात सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. एकीकडे होळीचा जल्लोष दिसत असला तरीही दुसरीकडे मद्यधुंद लोकांमुळे काही ठिकाणी उत्सवाला गालबोट लागताना दिसत आहे. यातच भर म्हणून सुट्टीसाठी गोव्यात दाखल झालेले पर्यटक बीचवर खुलेआम मद्यपान करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसात याच मद्यधुंद पर्यटकांमुळे लाईफगार्ड्ची डोकेदुखी वाढली आहे.

होळीच्या वीकएंडपासून गोव्यात पर्यटक (Tourist) मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. गोव्यात दाखल होताच सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करण्याला महत्त्व देतात. गोव्यात इतर राज्यांच्या तुलनेत मद्याचे दर खूपच कमी आहेत. मात्र हेच सध्या गोव्यात डोकेदुखीचं कारण ठरलं आहे. कांदोळी (Candolim) बीचवर एका पर्यटकाचा अतिमद्यप्राशनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे बागा बीचवरुन हरवलेला एक अल्पवयीन मुलगा सिकेरीमध्ये सापडला. झारखंडमधील या मुलाला लाईफगार्ड्सनी 4 तासांच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढलं. बेशिस्त पर्यटकांमुळे लाईफगार्ड्ससमोरील आव्हानं वाढली आहेत.

बऱ्याचदा पर्यटक बीचवरच मद्यपान करतात आणि दारुच्या नशेत बीचवरच (Beach) झोपतात. दारुच्या नशेत असलेल्या पर्यटकांना आवरणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. पाण्यात मद्यधुंद पर्यटक सर्रासपणे जात असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवणं हे एक आव्हान ठरत असल्याचं लाईफगार्ड्सचं म्हणणं आहे. किनाऱ्यावर हिंदी आणि इंग्लिशमधून वेळोवेळी पाण्यात न जाण्याच्या सूचना लाऊडस्पीकरच्या माध्यमातून दिल्या जात असतात. काहीवेळा तर कन्नडसारख्या भाषांमधूनही पर्यटकांना सूचना देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र पर्यटक याकडे डोळेझाक करतात आणि त्यामुळे अपघाताची शक्यता बळावते.

काही पर्यटन व्यावसायिकांनीही पर्यटकांना बीचवर मद्यपान करण्यापासून रोखण्याची मागणी केली आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यटक किनाऱ्यावर येत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं कठीण असल्याचं स्थानिक व्यावसायिकांचं म्हणणं आहे. दारु पिऊन पर्यटक पाण्यात उतरतात आणि नशेत त्यांचा तोल जातो. त्यांचा जीव वाचवण्यासाठी लाईफगार्ड्सना मात्र जीवाची बाजी लावावी लागते. किनारे वगळता रस्त्यांवरही मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने गोव्यात अपघातांमध्ये (Accident) मोठी वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT