Vasco  Dainik Gomantak
गोवा

Vasco News : साचलेल्या पाण्यामुळे आजारांना आमंत्रण, त्वरित उपसा करा; वास्कोतील लहानग्यांचे आवाहन

स्थानिकांना डेंग्यू, मलेरियाआदी आजारांना सामोरे जावे लागेल : शंकर पोळजी

गोमन्तक डिजिटल टीम

बोगदा येथे एका सरकारी इमारतीचे बांधकाम अर्धवट सोडण्यात आल्याने तेथील टाक्यांतील पाण्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांना डेंग्यू, मलेरियाआदी आजारांना सामोरे जावे लागेल, अशी भीती सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी व्यक्त केली आहे.

टाक्यांतील पाण्याचा उपसा करण्यासाठी लोकप्रतिनिधी, मुरगाव पालिका, आरोग्य खाते आदींना आवाहन केले होते परंतू आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे रविवारी लहान मुलांनी विविध फलक हाती घेऊन प्रतिकात्मक निषेध व्यक्त केला. दोन दिवसात पाण्याचा उपसा करण्यात आला नाही, तर आपण उपसा करण्यासाठी पुढाकार घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारी इमारतीचे बांधकाम अर्धवट सोडण्यात आले आहे. त्यामुळे तेथे असलेल्या तीन टाक्यांतील पाण्यामध्ये सध्या कचरा, गाळ तयार झाला आहे. त्या टाक्या म्हणजे डासांची पैदास केंद्रे झाली आहेत, अशी भीती पोळजी यांनी व्यक्त केली आहे.

याविरोधात गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आवाज उठविण्यास आरंभ केला आहे. परंतु 'मलेरिया, डेंग्यूमुक्त गोवा' अशा घोषणा देणारे सरकार या समस्येकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. फक्त आरोग्य खात्याने तेथील रहिवाशांना डेंग्यू, मलेरिया आदी आजारांबाबत माहिती देऊन सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

डासांना पिटाळून लावण्यासाठी धूरही सोडण्यात आला होता, असे आरोग्य खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. लोकांच्या आरोग्याचा विचार करून तेथील पाण्याचा उपसा करण्यासाठी मुरगाव पालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही एका रहिवाशाने सांगितले.

बांधकाम बंद असलेल्या इमारतींच्या टाक्यांतील घाण पाण्याचा उपसा करण्यासासाठी कोणीच तयार नसल्याने शंकर पोळजी यांनी रविवारी (दि. 28) सकाळी काही लहान मुलांसह तेथे येऊन निषेध व्यक्त केला.

लहान मुलांनी घोषणा फलक हातात धरून रहिवाशांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा उपसा करण्यास तसेच पावसाळ्यात पाणी जमा होऊ नये यासाठी संबंधितांनी खबरदारी घेण्याची गरज होती, परंतु संबंधित प्रशासन दखल घेण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. याप्रकरणी पोळजी यांनी संताप व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT