Vasco Rain Dainik Gomantak
गोवा

Vasco Rain : पावसाळ्‍यापूर्वी नाले, गटार स्‍वच्‍छ करणार : आमदार कृष्णा साळकर

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco Rain :

वास्को, पावसाळ्यापूर्वी मोठे नाले व गटारांमधील गाळ उपसण्‍याचे काम पूर्ण करण्‍यात येईल. मोठ्या झाडांच्या फांद्यांची व्यवस्थित छाटणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

लोकांचे आरोग्य व जीविताला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्‍यात येत आहे, असे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले.

शहर भागातील विविध ठिकाणच्या मोठ्या झाडांच्या फांद्या कापणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी

गोवा शिपयार्डतर्फे मोठी क्रेन पुरविण्यात आली होती. धोकादायक

फांद्या कापण्यात आल्याने पावसाळ्यात त्या तुटून पडण्‍याची भीती दूर झाली आहे.

यासंबंधी साळकर म्हणाले की, यापूर्वी स्वतंत्रपथावरील अशोक वृक्ष उन्मळून पडून वाईट घटना घडली होती. त्‍यामुळे धोकादायक व जुनी झाडे वन खात्याच्या परवानगीने कापण्यात आली. त्यामुळे धोका दूर झाला आहे.

यापूर्वी शहर भागात पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्याने पाणी रस्त्यावर साचून राहत होते. आम्ही पुढाकार घेऊन पाहणी केली. त्यानंतर क्रॉस ड्रेनेज बांधण्यात आल्यावर ही समस्‍या सुटली.

बेलाबाय, खारीवाडा येथील सखल भागात पावसाचे पाणी साचण्याचे, आसपासच्या घरांमध्‍ये पाणी शिरण्‍याचे प्रकार घडतात. ते रोखण्‍यासाठी तेथील रस्त्यांची उंची तसेच कल्वर्टची रुंदी वाढविण्यात येणार आहे. यासाठी संबंधित खात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

- कृष्‍णा साळकर, आमदार (वास्‍को)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT