CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Aires Rodrigues: 'गोव्यावर नागपूरचे कन्ट्रोल, CM च्या कार्यालयात RSS चे शक्तीशाली भूत'

जुलै 2020 पासून मुख्यमंत्री कार्यालय ज्या महिलेकडून अभासी पद्धतीने चालविले जात आहे

Pramod Yadav

माहिती अधिकार कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज (Aires Rodrigues) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. गोव्याच्या राज्यकारभारात थेट महाराष्ट्रातील नागपूर (Nagpur) येथून हस्तक्षेप होत असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कार्यालयात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची (RSS) एक शक्तीशाली व्यक्ती असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या व्यक्तीमुळे राज्यातील प्रशासकीय अधिकारी देखील त्रस्त झाले असल्याचे रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे.

आयरिश रॉड्रिग्ज यांनी याबाबत आपल्या अधिकृत ब्लॉगवर एक ब्लॉग (Blog) लिहला आहे. 'महाराष्ट्रातील डॉ. प्रतिभा या जुलै 2020 पासून गोव्यात आहेत. आरएसएसचा वरदहस्त असलेल्या मुंबई येथील दीनदयाल संशोधन केंद्रातून त्यांनी शिक्षण घतले आहे. कोरोना काळात त्यांना नागपूर येथील आरएसएस कार्यालयातून गोव्यात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. डॉ. प्रतिभा गोव्यात कशा दाखल झाल्या याबाबत केवळ मुख्यमंत्री सावंत आणि गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे माहिती देऊ शकतील.' असे रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे. तसेच, 'जुलै 2020 पासून मुख्यमंत्री कार्यालय ज्या महिलेकडून अभासी पद्धतीने चालविले जात आहे, त्याबाबत गोवा सरकारने राज्यातील नागरिकांना माहिती द्यायला हवी,' असेही रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे.

'डॉ. प्रतिभा यांनी कोणत्याही प्रकारच्या गोपनियतेची शपथ घेतलेली नाही. तरीही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यलायातील सर्व प्रकारची गोपनीय कागपत्रे, प्राशासकीय फाईल्स, मंत्रिमंडळ निर्णयाची कागदपत्रे हाताळण्याची परवानगी आहे. याशिवाय राज्याच्या अर्थसंकल्पीय बैठकीत देखील त्या हजर असतात व प्राशासकीय अधिकाऱ्यांना देखील त्या सवाल करू शकतात. राज्यातील IAS अधिकारी या महिलेच्या हस्तक्षेपामुळे त्रस्त झाले आहेत.' असेही आयरिश रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे.

'गोव्यातील सर्वात शक्तीशाली महिला म्हणून त्या पुढे आल्या आहेत. ही महिला नागपूर येथील आरएसएसच्या उच्च पदस्थ लोकांच्या थेट संपर्कात असून, त्यांना गोवा सरकारची सर्व खाती, अधिकारी यांची माहिती मिळत आहे. राज्यातील नागरिकांना मात्र या महिलेला कोणत्या अटी आणि शर्तीवर अधिकार देण्यात आल्यात याबाबत काहीच माहिती नाही. ही महिला प्रशासनात नियमित हस्तक्षेप करत असून, RSS विचारसरणी नसलेल्या व्यक्तींना काढून टाकत असल्याचा आरोप देखील या महिलेवर करण्यात आला आहे.' असे आयरिश रॉड्रिग्ज यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

Goa Politics: 'आरजी'कडून निलंबित खोलकरांना चौकशीसाठी नोटीस; 7 ऑगस्‍टला हजर राहण्‍याचे निर्देश

SCROLL FOR NEXT