CoP16 Colombia Meet  Dainik Gomantak
गोवा

Goa Delegate at COP16: संयुक्त राष्ट्राच्या 16 व्या COP परिषदेत डॉ. प्रदीप सरमोकादम करणार गोव्याचं प्रतिनिधित्व

Dr. Pradip Sarmokadam: कोलंबियात सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजेच CoP 16 या परिषदेचे गोव्यातील राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य डॉ. प्रदीप सरमोकादम यांना निमंत्रण

गोमन्तक डिजिटल टीम

UN CoP16 Meet Colombia

कोलंबिया: कोलंबियात सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजेच CoP 16 या परिषदेचे गोव्यातील राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य डॉ. प्रदीप सरमोकादम यांना निमंत्रण आले आहे.

परिषदेत जैवविविधतेचे संवर्धन या विषयावर ते जगभरातील तज्ज्ञांसमोर मत व्यक्त करणार आहेत. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सरमुकादम यांनी गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

कोलंबियात संयक्त राष्ट्र संघाच्या जैवविविधतेचे अधिवेशन सुरू आहे. CoP 16 या अधिवेशनात जगाच्या कानाकोपऱ्यातील पर्यावरणतज्ज्ञ उपस्थित आहेत. एकीकडे जमिनीची धूप आणि समुद्र पातळीतील बदल होतायंत. दुसरीकडे लहरी हवामान आणि वाढते प्रदूषण यामुळे निसर्गाचे नुकसान होतेय आणि परिणामी जैवविविधतेसाठी धोका निर्माण झालाय याच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी यंदाच्या अधिवेशनाची संकल्पना Make Peace With Nature अशी ठेवण्यात आली आहे.

डॉ. प्रदीप सरमोकादम म्हणतात की..

या जागतिक परिषदेमध्ये होणाऱ्या चर्चांमधून गोव्याला जैवविविधता संवर्धनासाठी काही धोरणे निश्चित करण्यास मदत मिळेल. या अधिवेशनातून गोव्यासाठी नक्कीच काही तरी शिकायला मिळेल.

मी काही चर्चासत्रांमध्येही सहभागी होणार आहे. यापूर्वी इजिप्तमधील अधिवेशनात मी उपस्थित होतो, असे मुकादम यांनी इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणुसकीशून्य कोडगेपणा! तत्परतेसाठी 25 लोक जळून मरायची वाट का पाहिली? देशभर नाचक्की झाल्यावर 'इभ्रत' राखण्याची मोहीम- संपादकीय

Arpora Nightclub Fire : हडफडे अग्नितांडव! अजय गुप्ताला दिल्लीतून अटक, 'गोगी टोळी'सह 'काळ्या पैशाचे' लागेबांधे उघड

अग्रलेख: शनिवारची रात्र ठरली भयाण किंकाळ्यांची! हडफडे अग्निकांडाने उफळला संताप, 25 बळींचा हिशोब कोण देणार?

Arpora Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेला कायदेशीर वळण! 'एसआयटी' चौकशीसाठी हायकोर्टात याचिका दाखल; 16 डिसेंबरला सुनावणी

वास्कोत भररात्री गोंधळ! प्रार्थनास्थळी दानपेटी फोडली, मूर्तीचे नुकसान, अंतर्वस्त्रे घालून फिरणाऱ्या व्यक्तीवर संशय; कोण आहे हा 'अर्धनग्न' संशयित?

SCROLL FOR NEXT