goa Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोलीसाठी सरकारचे सहकार्य डॉ. चंद्रकांत शेट्ये

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, लोकसभा निवडणूक एकदाची झाली. आता पुन्हा एकदा डिचोलीच्या विकासासाठी काम करूया. डिचोलीच्या विकासासाठी भाजप सरकारकडून उत्तम सहकार्य लाभले.

त्यामुळेच भाजपसह समर्थक कार्यकर्ते आणि मतदारांनी लोकसभा निवडणुकीत चांगले कार्य केले, अशी माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत केले.

गुरुवारी (ता. ६) सायंकाळी मुळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेस डिचोली भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर, सरचिटणीस डॉ. कौस्तुभ पाटणेकर, वल्लभ साळकर, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी अन्य नगरसेवक, विविध पंचायतींचे सरपंच आणि पंचसदस्य तसेच भाजपच्या विविध मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

गत विधानसभा निवडणुकीवेळी भाजप आणि माझे कार्यकर्ते वेगवेगळ्या दिशेने होते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि माझे समर्थक संघटित झाले.

माजी आमदार राजेश पाटणेकर आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि विविध मोर्चाचे कार्यकर्ते प्रचारकार्यात सक्रिय सहभागी झाले. रखरखत्या उन्हाची पर्वा न कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचार केला. त्याची फलश्रुती म्हणून डिचोलीत श्रीपादभाऊंना विक्रमी मताधिक्य मिळाले, असा दावा आमदार डॉ. शेट्ये यांनी करून यशाचे श्रेय सर्व कार्यकर्त्यांना दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

SCROLL FOR NEXT