Dr. Gauri Achari Murder Case Dainik Gomantak
गोवा

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! संशयित गौरव बिद्रेविरोधात तीस पानांचे आरोपपत्र

ओखळ परेडमध्ये संशयिताला ओळखले होते आणि त्याचे अशाच प्रकारे इतर मुलींशी संबध होते अशी माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरणात संशयित गौरव बिद्रे याच्याविरोधात जुने गोवा पोलिसांनी अतिरिक्त आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. नव्याने सादर केलेल्या तीस पानी आरोपपत्रात आणखी आठ साक्षिदारांचा उल्लेख केला आहे.

ओखळ परेडमध्ये संशयिताला ओळखले होते आणि त्याचे अशाच प्रकारे इतर मुलींशी संबध होते अशी माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे.

खांडोळा सरकारी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. गौरी आचारी 23 जून 2022 रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने जुने गोवा पोलिसांत दिली होती. पोलिसांनी संशयित गौरव बिद्रेला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली होती.

खोर्ली-जुने गोवे येथे गौरीच्या घराजवळच कारमध्ये तिचा खून करून मृतदेह कदंब पठाराजवळच्या झुडपात टाकल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी बिद्रे विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

दरम्यान, ओळख परेडमध्ये गौरव बिद्रे याचा चाचणी अहवाल सकारात्मक आला. याशिवाय पोलिसांनी बिद्रे याचे आणखी मुलीबरोबर मैत्रीचे सबंध असल्याचे समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT