Giving life to others through blood donation Dainik Gomantak
गोवा

रक्तदानाद्वारे इतरांना जीवनदान देण्याचे कार्य करा: डॉ. दिव्या राणे

अडवई येथील शिबिरात 40 जणांचा सहभाग

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: मनुष्य जीवनात रक्तदान करणे हे फार मोठे पुण्याचे कार्य आहे, ज्या प्रमाणे डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवतो त्या प्रमाणे रक्तदान करणारा हा तीन माणसांचा जीव वाचवतो. त्यामुळे अशा महान कार्यास सहभागी होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे उद्‍गार पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी काढले.

पर्ये भाजप मंडळाच्यावतीने अडवई-सत्तरी येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्‍घाटन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी केरी जिल्हा पंचायत सदस्या देवयानी गावस, भिरोंडा पंचायतीचे सरपंच आद्राद तेरेजा, वाळपई सामाजिक आरोग्य केंद्राचे डॉ. शाम काणकोणकर, डॉ. अभिजीत वाडकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. दिव्या राणे म्हणाल्या की, केंद्रातील आणि राज्यातील डब्बल इंजिन सरकार हे सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून विकास करीत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून रक्ताची सोय करून देण्यासाठी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

डॉ. शाम काणकोणकर यांनी सरकार तसेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या सहकार्याने आरोग्य खात्याच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. भिरोंडाचे सरपंच आद्राद तेरेजा यांनी स्वागत केले. पंच उदयसिंह राणे यांनी सूत्रसंचालन केले. शिबिरात सुमारे ४० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.

भिरोंडातील समस्या सोडवणारच!

पर्ये मतदारसंघातील जनतेने आपल्याला भरघोस मतांची आघाडी देऊन आपल्याला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, त्या संधीचे सोने करताना आपण पर्ये मतदारसंघात अपूर्ण असलेला विकास पुढे नेणार आहे, त्यासाठी राज्याचे आरोग्य तथा वनमंत्री विश्वजित राणे यांचे सहकार्य लाभणार आहे. भिरोंडा पंचायत क्षेत्रातील जनतेला सतावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून त्यासाठी ज्या काही समस्या असतील त्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात, पर्ये मतदार संघातील जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आपण आठवड्यातून एक दिवस वाळपई येथील कार्यालयात उपस्थित असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT