सासष्टी: दवर्ली दिकरपाल पंचायत हद्दीचे सीमा सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी एका खासगी सर्वेक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. सध्या पंचायतीकडे सीमेबद्दल डाटा उपलब्ध नाही, असे उपसरपंच विद्याधर आर्लेकर यांनी रविवारी झालेल्या ग्रामसभेनंतर पत्रकारांना सांगितले.
आर्लेकर यांनी पुढे सांगितले की, काही लोकांनी बांधकाम परवान्याच्या फाइल पंचायतीमध्ये उपलब्ध नाही अशी तक्रार केली आहे. त्याची चौकशी केली जाईल. त्याच प्रमाणे बेकायदा बांधकामांना नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पंचायतीने नोटिसा काढलेल्या आहेत. गट विकास अधिकाऱ्यांकडून परवानगी आल्यावर व त्यांची मान्यता मिळाल्यावर पुढील कारवाई केली जाईल.
आर्लेकर यांनी सांगितले की, आपला प्रभाग तीनमधील भाडेकरूंची तपासणी सुरू झाली होती. आता ही तपासणी पोलिस करीत आहेत. त्यामुळे आपण पुढाकार घेऊन जे कोण भाडेकरू आहेत त्यांचे फोटो व माहिती पोलिसांकडे (Police) सुपूर्द केली आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामसभेत गावातील अनेक प्रश्न, कोमुनिदादची जागा, मैदान, जैवविविधता समिती याबाबत चर्चा करण्यात आली असे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थ एण्ड्र्यू रेबेलो यांनी सांगितले की, या ग्रामसभेला जिल्हा पंचायत सदस्य व स्थानिक आमदाराने उपस्थित राहावे अशी विनंती ग्रामस्थांनी केली होती. मात्र दोघेही आज गैरहजर राहिले, त्यामुळे लोक नाराज झाले. ग्रामस्थांना त्यांच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरे हवी होती. गेल्या १५ वर्षांत पंचायतीने जे बांधकाम परवाने दिले आहेत, त्याच्या फायली गायब झाल्याचे कळले आहे. तसेच भाडेकरूंची तपासणी संदर्भातील अहवालही पंचायतीत उपलब्ध नाही. आरोग्य केंद्रामध्ये सकाळच्या वेळी केवळ दोन तासांसाठी एक डॉक्टर येतो, संध्याकाळच्या वेळी येत नाही. हा प्रश्न एरव्ही आमदाराने सोडवायला पाहिजे होता.
या पंचायत क्षेत्रातील दोन झरे व ४ तळ्या आहेत. त्याचे रक्षण व त्यास कसलीही बाधा पोहचू नये असा आग्रह ग्रामस्थांनी ग्रामसभेत धरला. तसेच या पंचायत क्षेत्रात गतिरोधक घालण्यात आले आहेत, मात्र झेड क्रॉसिंगची कमतरता भासत आहे. तसेच पंचायतीतील विकास कामे मंदावली आहेत, यावर ग्रामस्थांनी आवाज उठवला. घरपट्टी वाढविण्याचा पंचायतीचा प्रस्ताव आहे, मात्र हा निर्णय घाईगडबडीत न घेता तो विचारपूर्वक व ग्रामस्थांना विश्र्वासात घेऊन घ्यावा अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आल्याचे रेबेलो यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.