Morjim Beach Dainik Gomantak
गोवा

Morjim: मोरजी गावामध्ये काँक्रिटचे जंगल नकोच!

Morjim: मोरजीवासीयांचे देवतांना गाऱ्हाणे: पर्यावरणास घातक मेगा प्रकल्पांना विरोध

दैनिक गोमन्तक

Morjim: आमच्या निसर्गसंपन्न मोरजी गावचे सिमेंटचे जंगल होऊ नये,यासाठी आताच सर्वजण जागे व्हा, गोव्याबाहरचे लोक येऊन येथील जमिनी खरेदी करतात.आणि मोठमोठाले प्रकल्प उभारून येथील शांतता तसेच गावचे पर्यावरण बिघडवून टाकतात.

हे रोखण्यासाठी संबंधितांना सद्‍बुद्धी द्यावी,असे मोरजीतील युवकांनी मोरजाई देवी तसेच कळस मांगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात गणपती बाप्पाला गाऱ्हाणे घातले. मोरजी गावचे पर्यावरण आणि गावचे गावपण टिकून रहायला हवे, गावात प्रदूषणकारी आणि पर्यावरणास घातक प्रकल्प येऊ नयेत,यासाठी मोरजीवासीयांनी जागे व्हावे,असे आवाहन करण्यात आले.

शेती बुजवून हॉटेल्स उभारली जातात. कॉंक्रिटचे जंगल आजच रोखले नाही, तर उद्या मुलांना आम्ही निसर्ग दाखवू शकणार नाही. घाबरू नका, पुढे या,असे आवाहन युवकांनी केले.

पंचायत कुठे आहे?

परप्रांतीयांना तात्काळ कुपनलिका खोदून पाणी उपलब्ध करून दिले जाते. मात्र, प्रत्येक वाड्यावर पाण्याची समस्या जाणवत आहे. गावच्या समस्यांसाठी आम्ही पुढे येतो,पण पंचसदस्यांना वेळ नसतो, असा संताप काही युवकांनी व्यक्त केला.

मोरजीतील जमिनी खरेदी करून मोठमोठाले प्रकल्प उभारून दिल्लीकरांनी मोरजीची वाट लावली आहे. पंचायतीनेही मोरजी गावची वाट लावली आहे.त्यामुळे मोरजीवासीयांनी जागे व्हावे.
-गणेश शेटगावकर, मोरजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

Omkar Elephant: ओंकार हत्ती 'शांत'च! उपवनसंरक्षकांकडून 'अग्रेसिव्ह' चर्चांना पूर्णविराम, रेस्क्यूसाठी चार ठिकाणं निवडली

Gold Price: बाजारात महागाईचा तडाखा! सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड; पहिल्यांदाच 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 30 हजाराच्या पार

'खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची सुरू, 15 दिवसांत काणे पूर्ण होणार'; आपच्या निवेदनानंतर CM सावंतांची माहिती

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

SCROLL FOR NEXT