Fatorda Dainik Gomantak
गोवा

Fatorda News : घाऊक मासळी मार्केट हलवू नका ! मडगावातील किरकोळ विक्रेत्यांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Fatorda News :

फातोर्डा, मडगावातील घाऊक मासळी बाजार वेर्ण्यामध्ये गेल्यास टोपलीत घेऊन दारोदारी फिरून विक्री करणाऱ्या किरकोळ मासळी व्यावसायिकांना परवडणारे नसल्याचे सांगून त्यांनी उपजीविकेचे साधन हिरवण्याची भीती व्यक्त केली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.मडगावातील घाऊक मासळी बाजाराचे बांधकाम सुरू असल्याने हा बाजार तूर्त सहा महिन्यांसाठी वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये हलविण्याची तयारी चालली आहे. त्यामुळे सासष्टीतील मच्छिमार लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

विशेषत: जे मासळीच्या छोट्या टोपल्या घेऊन दारोदारी फिरून मासळी विकण्यावर विसंबून आहेत, त्यांना आर्थिक फटका बसणार आहे. यात स्थानिक मच्छिमार महिलांचा लक्षणीय समावेश आहे.

काही युवक आणि वयस्क पुरुष सायकल आणि बाईकवरून घरोघरी जाऊन मासे विकून कुटुंबाचे पालन पोषण करतात. तर काही विक्रेते दुचाकीवरून शिरोडा, बोरी, लोटली, पारोडा, कुडतरी अशा लांबच्या ठिकाणी मासे विकतात. त्यामुळे वेर्णा येथे मासळी खरेदीसाठी गेल्यास त्यांचा पेट्रोलचा खर्च वाढणार आहे. या अतिरिक्त खर्चामुळे त्यांना नुकसान सोसावे लागणार आहे.

उत्पन्नावरही परिणाम होण्याची भीती आहे. दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने मडगावातील घाऊक मासळी बाजार संकुलाचे सुरू असलेले काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांसाठी घाऊक मासळी मार्केट वेर्णा येथे स्थलांतरित करण्याचे ठरविले आहे. या तात्पुरत्या जागेवर घाऊक मासळी व्यावसायिकांनी सुद्धा यापूर्वीच आक्षेप व्यक्त केला आहे.

कुडतरी येथील मासे विक्रेत्या जॅकीना फर्नांडिस म्हणाल्या, पहाटे ४.३० ते ५ च्या सुमारास येथील होलसेल मार्केटमध्ये आपला मुलगा दुचाकीने येतो. येथे घाऊक दरात मासळी खरेदीसाठी अर्धा ते एक तास वाया जातो.

त्यानंतर आके पॉवर हाऊसपासून दवर्लीपर्यंत फिरून मासळी विकते. हे परवडण्यायोग्य असे आहे, जर वेर्णा येथे मासळी मार्केट स्थलांतरित झाल्यास जाऊन येण्यासाठी वेळेचा ताळमेळ व अधिक पेट्रोल इंधनाचा खर्च परवडणारे नाही.

परवडणार नाही !

नावेली मासळी मार्केटमध्ये किरकोळ मासळी विक्रेत्या क्रिस्टिना यांनी सांगितले की, मार्केट वेर्ण्यात हलविल्यास तिथे जाऊन मासे खरेदी करून विकणे परवडणार नाही.

शिरोडा येथे दुचाकीने मासे विक्री करणारे संतोष हरिजन म्हणाले, मडगाव पासून वेर्णा गाठण्यासाठी १२ ते १५ किमीचे अधिक अंतर गाठावे लागणार आहे. त्यामुळे पेट्रोलचा खर्च वाढणार आहे. अशाने मासळीचे दर वाढवावे लागतील. या वाढीव दराला ग्राहकांनी प्रतिसाद दिल्यास चांगले अन्यथा हे प्रकरण अंगावर शेकणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT