Vinod Nageshkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'खोटं सांगू नका, ढवळीकर कुटुंबीयांशी माझे चांगले संबंध'; नागेशकरांचा मंत्री गावडेंना दिशाभूल न करण्याचा सल्ला

BJP MGP Alliance Row: सुदिन ढवळीकर यांच्याशी माझा वाद असला तरी ढवळीकर कुटुंबीयांशी माझे पूर्वीपासून चांगले संबंध होते आणि आहेत; विनोद नागेशकर

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: मगोपचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना १९९९ च्या निवडणुकीवेळी मगोपचे तिकीट देण्यासाठी मी आणि विनोद नागेशकर हे कारणीभूत आहोत, असे खोटे सांगून प्रियोळचे आमदार तथा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी लोकांची दिशाभूल करू नये, असे स्पष्ट मत बांदोडा मतदारसंघाचे माजी जिल्हा पंचायत सदस्य विनोद नागेशकर यांनी व्यक्त केले.

फोंड्यात शुक्रवारी (०४ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत नागेशकर बोलत होते. यावेळी मगोप कार्यकारिणीचे सदस्य अनिल नाईक तसेच बांदोड्याचे पंचसदस्य सुखानंद कुर्पासकर आदी उपस्थित होते. नागेशकर म्हणाले, मी गेली १५ वर्षे राजकारणापासून अलिप्त आहे. मात्र, मगोपच्या वादात माझे नाव गावडे यांच्याकडून गोवले गेल्यामुळेच तसेच अनेकांकडून मला या प्रकरणाविषयी विचारणा झाल्यामुळेच मला पत्रकारांसमोर जाणे इष्ट वाटले.

गावडेंच्या 'त्या' वक्तव्याने दुखावलो

नागेशकर यांनी गोविंद गावडे यांच्या विधानाचे खंडन करताना खोटे सांगू नका, खरे काय ते बोला, असे सुनावले. सुदिन ढवळीकर यांच्याशी माझा वाद असला तरी ढवळीकर कुटुंबीयांशी माझे पूर्वीपासून चांगले संबंध होते आणि आहेत. माधवराव ढवळीकर यांच्याशी तर अतिशय चांगले संबंध होते. त्यामुळेच मगोपला ढवळीकर यांच्या गोठ्यात नेऊन बांधण्याच्या वक्तव्यामुळे मी दुखावलो, असे नागेशकर म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रियोळ मतदारसंघाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि मगोप यांच्यात वादाची ठिणगी पडली. मंत्री गोविंद गावडेंनी थेट ढवळीकर बंधुंवर टीका करायला सुरुवात केली. सरकारमधील विद्यमान सुदिन ढवळीकरांनी मी राजकारणात आणल्याचा दावा करत ती आयुष्यातील मोठी चूक होती, असा दावा गोविंद गावडे यांनी केला होता. तसेच, ढवळीकरांनी गोव्यातील बहुजनांना संपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT