Francisco Sardinha Dainik Gomantak
गोवा

'गोवा सरकारने राज्याला कोळशाचे आगार करण्याचा विचार सोडावा'

गरज पडल्यास सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्राकडे नेण्याची सार्दिन यांची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव : रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पावर सर्वोच्च न्यायालयाने चाप आणलेला असताना निदान आतातरी केंद्र आणि गोवा सरकारने शहाणे होऊन गोवा कोळशाचे आगार करण्याचा आपला हट्ट सोडून द्यावा, अशी मागणी दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केली आहे.

मडगावात आज बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सार्दिन यांनी हा रेल मार्ग विस्तार प्रकल्प गोव्याला धोक्याच्या खाईत नेणारा असून हे गोवा सरकारने केंद्राला पटवून देण्याची गरज आहे. गरज पडल्यास आमदारांचे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ सरकारने केंद्रात न्यावे असा सल्ला देत असे केल्यास आपणही सरकारला मदत करण्यास तयार असल्याने काँग्रेस खासदार सार्दिन यांनी सांगितले.

काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांच्याबरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सार्दीन यांनी भाजप सरकारने लोकांना महागाईच्या खाईत लोटले असा आरोप करताना या सरकारने शपथविधीवर साडे पाच कोटी रुपये खर्च करण्याऐवजी त्याचा वापर जनकल्याणासाठी वापरले असते तर त्याचे चीज झाले असते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

पश्चिम बगल रस्ता स्टिल्टवरच बांधावा यासाठी आपण लोकसभेत आवाज उठविला असून आपला लोकांच्या या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोरही आपण हा प्रश्न मांडला असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT