Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : चर्चिल कधीपासून ज्योतिषी झाले?

विजय सरदेसाई : राज्य सरकारसह नगरपालिकेवर चौफेर टीका

दैनिक गोमन्तक डिजिटल

लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा भाजपच जिंकेल, असे विधान माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी केले आहे, त्यावर फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी प्रश्र्न केला की, चर्चिल कधीपासून ज्योतिषी बनले? जो पक्ष लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, लोकहिताचे प्रकल्प, योजना राबविल, त्यालाच लोक संधी देतील. सरदेसाई यांनी सरकार व मडगाव नगरपालिकेला सार्वजनिक हिताचे प्रकल्प अडवू नका, असेही ठणकावले.

12 लाख रुपये खर्चून जलस्रोत खात्यातर्फे फातोर्डा प्रभाग दोनमधील डोंगरवाड्यावर नवा नाला बांधण्यात येत आहे. या कामाच्या शुभारंभप्रसंगी सरदेसाई बोलत होते. यावेळी अन्‍य मान्‍यवरही उपस्‍थित होते.

कामे बिल्डरच्या फायद्याची

दिगंबर कामत हे सध्या नैराश्‍यातून जात आहेत. त्‍यांनी मडगाव मतदारसंघातील प्रकल्प व योजनांवर लक्ष केंद्रित करावे. सध्या जी कामे सुरू आहेत, ती कोणत्या बिल्डरच्या फायद्याची आहेत, याची यादीच मी तयार ठेवली आहे. लवकरच एकेक नाव जाहीर करेन, असा इशारा सरदेसाई यांनी दिला.

नगराध्यक्षांवर साधला निशाणा

‘जीसुडा’तर्फे जे प्रकल्प हाती घेतले जातात, ते पालिकेची मान्यता मिळाल्यावरच सुरू होतात. पण अद्याप ही जागा ‘जीसु़डा’च्या स्वाधीन केलेली नाही, असे नगराध्यक्ष म्हणतात त्याला काहीच अर्थ नाही. अशा प्रकल्पासाठी हस्तांतरण ही संकल्पनाच नसते. पण नगराध्यक्ष हे मडगावच्या आमदारांच्या हातचे बाहुले आहेत. हा प्रकल्प झाला तर पार्किंग समस्या सुटेल, असेही सरदेसाई म्हणाले.

‘ते’सुद्धा एकाच माळेचे मणी

चर्चिल प्रत्येक वेळी भाजपलाच पाठिंबा देत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाबाबत नवल नाही. येत्या पावसाळ्यात बाणावलीत पूरस्थिती निर्माण होण्याची भीती सरदेसाई यांनी व्यक्त केली. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सबद्दल सरदेसाई म्हणाले की, तेसुद्धा आता एकाच माळेचे मणी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

Goa Weather: अखेर पणजीत पावसाचे अर्धशतक! राज्यात पावसाचा जोर मंदावला; वाळपईत सर्वाधिक 107 इंच, पणजीत सर्वात कमी 50 इंच

SCROLL FOR NEXT