Disallow Valentine Day 
गोवा

Disallow Valentine Day: व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास अनुमती देऊ नये, गोव्यातील महाविद्यालात हिंदू जनजागृती समितीचे निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखावी, हिंदू जनजागृती समितीची मागणी

Pramod Yadav

Disallow Valentine Day: ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने म्हापसा, काणकोण, चोडण, शिवोली, डिचोली, आदी ठिकाणी शासकीय अधिकारी, तसेच विविध विद्यालयांचे व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या काही वर्षांत 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा सर्वत्र रुढ झाली आहे. पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकतेच्या गर्तेत ओढली जात आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करत हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, असे हिंदू जनजागृती समितीच्या निवेदनात म्हटले आहे.

महाविद्यालयांत ‘व्हॅलेंटाईन डे’चे दुष्परिणाम, तसेच भारतीय संस्कृतीची महती सांगणार्‍या व्याख्यानाचे आयोजन करणे, महाविद्यालयात ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यास अनुमती न देणे आणि या दिवशी गैरप्रकार आढळल्यास त्वरित कारवाई करणे, अशा मागण्या हिंदू जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT