Dona Paula Jetty  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: दोनापावला येथील जेटी अद्याप बंदच!

Goa: नोव्हेंबर महिन्यातील पर्यटन खात्याच्या बैठकीनंतर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ही जेटी 5 डिसेंबरला खुली होईल, असे सांगितले होते.

दैनिक गोमन्तक

Dona Paula Jetty: पर्यटकांचे आकर्षण असणारी दोनापावला जेटी नूतनीकरणानंतर मागील वर्षी डिसेंबरच्या 5 रोजी खुली होईल, असे आश्‍वासन पर्यटनमंत्री रोहन खंवटे व महूसलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी दिले होते.

डिसेंबरची आणि जानेवारी 2023 मधील 5 तारीखही गेली, तरीही ही जेटी काही खुली झालेली नाही. विशेष म्हणजे पर्यटकांचा ओघ कायम असला, तरी ती कधी खुली होणार याविषयी त्यांच्यात उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून जेटी पर्यटकांसाठी बंद आहे. जेटीचे नूतनीकरणाचे काम पूर्णही झाले आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात पर्यटकांना ती खुली होईल, असे चित्र होते. नोव्हेंबर महिन्यातील पर्यटन खात्याच्या बैठकीनंतर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ही जेटी 5 डिसेंबरला खुली होईल, असे सांगितले होते.

मंत्री बाबूश मोन्सेरात यांनीही हीच री ओढली होती. त्यामुळे डिसेंबरमध्ये राज्यात मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांचा ओढा या जेटीकडे जाईल, असे वाटत होते.

पाहणी होणार कधी?

जेटीवरील व्यावसायिकांनी निर्माण झालेल्या नव्या दुकानांच्या गाळ्यांविषयी आक्षेप घेतल्यामुळे ते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन खात्याच्या अभियंत्यांकडून त्याची पाहणी होणे अपेक्षित होते,

परंतु त्या अभियंत्यांसाठी दुकानाचा नवा पॅटर्न तयार करून ठेवला आहे. त्यामुळे या पॅटर्नची पाहणी करून केंद्रीय पर्यटन खात्याकडून त्यास मंजुरी मिळाल्यानंतरच जुनी दुकाने हटविली जातील, परंतु अद्याप कोणी पाहणी केली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT