Vijai Sardesai alleges on Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

'Drug Destination' अशी गोव्याची प्रतिमा बनवायची आहे का? आमदार सरदेसाईंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

ड्रग्स हब कुठे झाले आहेत याची माहिती मिळूनही करवाई नाही- विजय सरदेसाई

Pramod Yadav

मुख्यमंत्री प्रमोद सावंत गोव्यातील अमली पदार्थ व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Goa Forward MLA Vijay Sardesai) यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना गोव्याची प्रतिमा 'ड्रग्स डेस्टिनेशन' अशीच बनवायची आहे का? असा सवाल सरदेसाई यांनी उपस्थित केला.

अंजूना येथे एका पर्यटक महिलेने अमली पदार्थांचे अती सेवन केल्याने तिला अत्यव्यस्त अवस्थेत इस्पितळात दाखल करण्यात आले आहे असे वृत्त असून त्यावर सरदेसाई यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

यावर बोलताना विजय सरदेसाई म्हणाले, "ड्रग्स ओव्हरडोसचे उघडकीस आलेले हे अलीकडचे चौथे प्रकरण आहे. यापूर्वी आम्हाला विधानसभेत या संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत यांनी आम्ही ड्रग्स विकणाऱ्याना अटक करू शकतो मात्र जे कोण गोव्यात ड्रग्स आयात करतात ते हाती लागत नाहीत असे म्हटले होते. हैदराबादचे पोलीस (Hydrabad Police) गोव्यात येऊन गोव्यात जे कोण ड्रग्सचा धंदा करतात त्यांना अटक करतात आणि गोव्यातील पोलीसांना ते मिळत नाहीत. आता याही प्रकरणात हैद्राबादहून पोलीसांनी येऊन तपास करावा असे मुख्यमंत्र्यांना वाटते का?" असा सवाल त्यांनी केला आहे.

गोव्यात कुठे ड्रग्स मिळतात आणि कुठल्या हॉटेल्समध्ये मध्यरात्री पर्यंत चालणाऱ्या पार्ट्यामध्ये ते विकतात याची सविस्तर माहिती एका गुप्त मेलद्वारे सरकारला आली होती. पण तरीही त्यावर काही कारवाई कशी होत नाही असा सवाल करून काही जणांना या बाबतीत हप्ते जातात आणि ते कोण ते सर्वांना माहीत आहे. हे हप्ते बंद होऊ नयेत म्हणून या गोष्टीकडे कानाडोळा केला जात आहे का असा प्रश्न त्यांनी केला आहे.

सध्या मुख्यमंत्री वेगवेगळ्या इव्हेण्टस मध्ये गर्क आहेत मात्र त्यांनी त्यातच गुंतून न राहता गृहमंत्री या नात्याने गोव्यातील या गंभीर समस्येकडेही लक्ष द्यावे अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

Bonderam: 'दिवाडी बेट' सजले! ‘बोंदेरा’ उत्साहात साजरा; सामुदायिक एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन

Salvador Do Mundo: साल्वादोर द मुंदचे ग्रामस्थ आक्रमक! कचरा, मैदानाची दुरवस्था, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर

Bhoma: 'मातीच्या भरावामुळे गाव धोक्यात'! भोम ग्रामसभेत संताप; चौपदरी रस्त्याचा प्रश्‍नही चर्चेत

Goa Live News: गोव्यातील फसवणूक प्रकरणात सिंगापूरच्या रहिवाशाला अटक!

SCROLL FOR NEXT