CM Pramod sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: दिल्ली गाजवलेल्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना बढती मिळणार? त्यांनीच दिली एक्सक्लूसिव्ह माहिती video

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिल्याने त्यांचा अधिक वावर राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात दिसत आहे.

Pramod Yadav

CM Pramod Sawant

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी सोपवली. मुख्यमंत्री सावंत यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचाराच्यानिमित्ताने गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली सारख्या राज्यात छाप सोडली.

मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिल्याने त्यांचा अधिक वावर राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात दिसत आहे. यामुळे मुख्यमंत्री सावंत यांना केंद्रीय पातळीवर बढती मिळणार का? अशी चर्चा सध्या गोव्यासह देश पातळीवरील राजकीय वर्तुळात सुरु आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. सावंत यांनी विविध ठिकाणी रॅलीत सहभाग घेतला तर, पाच मतदारसंघात कोपरा सभांना संबोधित केले. सावंत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आप आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली.

स्वाती मालिवाल प्रकरणात केजरीवाल गप्प का आहेत? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. केजरीवाल यांचे सरकार दिल्ली आणि महिलाविरोधी असल्याचा आरोप देखील सावंत यांनी केला. सावंत यांच्या आरोपांची दखल दिल्लीसह गोव्यातील आप नेत्यांनी घेतली.

गोव्यातून आप नेत्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सावंत म्हणाले की, केजरीवालांनी निवडणुकीसाठी दिलेले पैसे काहीजणांचे अजून संपले नाहीत, त्यामुळे काही नेत्यांना बोलावेच लागते. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या घरात घडणाऱ्या घटनेबाबत त्यांना बोलावेच लागेल. आप नेत्यांनी केलेल्या टीकेतील सर्व प्रकरणं न्यायप्रविष्ठ असल्याचे देखील सावंत यावेळी म्हणाले.

दिल्लीत जाण्याची तयारी सुरु आहे का?

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना दिल्लीत जाण्याची तयारी सुरु आहे का? याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. पक्षाने प्रचाराची छोटी जबाबदारी दिली असून, ती पार पाडत आहे. माध्यमातूनच अशा प्रकारची चर्चा केली जात असल्याचे सावंत म्हणाले.

मलाही दिल्लीत जायचे नाही, मला अजून काही वर्षे गोव्याची सेवा करायचीय. देवाने आणि लोकांनी गोव्याची सेवा करण्याची संधी दिलीय, अजूनही सेवा करण्याची इच्छा आहे. आणि लोकांचा आशिर्वाद आहे हे महत्वाचे असे, सावंत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची एक्सक्लूसिव्ह मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT