आगोंद: काणकोण येथील राजबाग तारीर या ठिकाणी असलेल्या द ललित तारांकित हॉटेलमध्ये स्थानिक कामगारांना न्याय द्या, अशी मागणी प्रदेश काँग्रेस समिती आणि गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी आज (बुधवारी) करीत हॉटेलचे सरव्यवस्थापक जेरोम फिलिप यांना निवेदन दिले. (Do justice to the local workers in 'The Lalit' starred hotel)
यावेळी प्रदेश काँग्रेसचे (Goa Congreess) सरचिटणीस जनार्दन भंडारी, गट काँग्रेसचे अध्यक्ष प्रलय भगत, गोवा फॉरवर्डचे नेते प्रशांत नाईक, रेमी बोर्जिस, गास्पर कुतिन्हो, क्लेस्टन व्हीएगस, सिद्धार्थ म्हाळशी, संदीप गावकर व 50 पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
द ललित हॉटेलमध्ये (Goa Hotel) 70 पेक्षा अधिक स्थानिक कामगार विविध विभागात काम करीत असून, गेल्या 18 वर्षापासून त्यांच्या वेतनात वाढ करण्यात आलेली नाही. या प्रकारामुळे कामगारांपुढे आर्थिक अडचणी येत आहेत. शिवाय घरखर्च चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने कामगारांना न्याय देऊन त्यांच्या हितासाठी कार्य करावे, असे कॉंग्रेस व गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी निवेदनाद्वारे सांगितले.
टप्प्याटप्प्याने कामगार रुजू
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना (Covid 19) संकटामुळे काही जणांना कामावरूनही कमी करण्यात आले होते. सध्या कोरोनाचे संकट आटोक्यात आले असून, ज्या कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते, त्यातील काही जणांना परत टप्प्याटप्प्याने कामावर घेण्यात येणार आहे. कॉंग्रेस व गोवा फॉरवर्डच्यावतीने देण्यात आलेले निवेदन कंपनीच्या प्रमुखांकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन सरव्यवस्थापक जेरोम फिलिप यांनी दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.