Diwali Road Accidents Dainik Gomantak
गोवा

Accident Death: दिवाळीत काळाचा घाला; अपघातांत तिघांचा मृत्‍यू, दोडामार्ग येथे अपघातात दोघांचा मृत्यू; वास्को येथील दुचाकीस्वार जागीच ठार

Diwali Road Accidents: सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच दोडामार्गजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच दोडामार्गजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. राजकुमार यादव (३०) आणि जोहारी यादव (३१) अशी त्‍यांची नावे असून, ते मूळ उत्तरप्रदेशमधील आहेत.

दोघेही चुलत भाऊ होते. दरम्‍यान, मोले बाजार परिसरात आज पहाटे चारच्‍या सुमारास दुचाकी आणि ट्रक या दोन वाहनांमध्‍ये झालेल्‍या अपघातात कौशल केवल जयस्‍वाल (२६, रा. मांगोरहिल-वास्को) हा युवक ठार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोडामार्ग-तिळारी मार्गावरील भेडशी येथे सोमवारी सकाळी पिकअप आणि दुचाकी यांच्यात ही धडक झाली. अपघातात बळी पडलेले दोन्ही युवक रंगकामाचा व्यवसाय करत होते. पिकअप दोडामार्गच्या दिशेने तर दुचाकी विरुद्ध दिशेने जात होती. हा अपघात एवढा भीषण हाेता की दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. गंभीर जखमी अवस्‍थेत दोन्ही युवकांना दोडामार्ग सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुचाकीची नोंदणी महाराष्ट्रातील (एमएच-०७-एडी-५२१२) अशी आहे. तर, अपघातग्रस्त पिकअप या दिवाळीतच खरेदी करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

क्षणात हिरावला दिवाळीचा आनंद

दिवाळीच्या उत्सवी वातावरणात दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याच्या काळातच काळाने घाला घातल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मोले बाजारात भीषण अपघात

मोले बाजार परिसरात पहाटे सुमारे ४ वाजता दुचाकी आणि अवजड ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन एका २६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. कौशल केवल जैस्वाल (रा. मांगोरहिल, वास्को) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, KA-30-A-5834 क्रमांकाचा ट्रक मोले येथून अनमोड घाटाच्या दिशेने जात होता. दरम्यान, हा ट्रक मोले बाजार परिसरात रस्त्याच्या बाजूला अयोग्य पद्धतीने उभा करण्यात आला होता. त्याच दिशेने जाणारी GA-06-Y-2050 क्रमांकाची अ‍ॅक्टिव्हा दुचाकी ट्रकच्या मागील बाजूस जोरात धडकली.

या भीषण धडकेत दुचाकीस्वार कौशल जैस्वाल यांचे डोके जोरात आपटल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी धारबांदोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mudukud Mobile Network Outage: संपर्क साधायचा कसा? मुडकूडमध्ये 20 दिवसांपासून मोबाईल नेटवर्क ठप्प! नागरिकांची मोठी गैरसोय

आरोपीला 48 तासांत अटक करा; 4 वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी काँग्रेस आक्रमक, म्हापसा पोलिस ठाण्यावर धडक

Mapusa Girl Assault Case: बालिकेवरील अत्‍याचाराने म्‍हापसा हादरले! दिवाळीच्या रात्री अमानुष कृत्य; फुगे विकणाऱ्या कुटुंबातील चिमुरडी अत्याचाराची बळी

Supreme Court Ruling: '48 तासांपेक्षा जास्त कोठडीत राहिल्यास सरकारी कर्मचारी आपोआप निलंबित होणार'; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

कदंब कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, मागण्या पूर्ण करण्यासाठी महामंडळातर्फे प्रयत्न- उल्हास तुयेकर

SCROLL FOR NEXT