बायणा येथे ब्रह्मस्थळ संस्थानात नरकासूर प्रतिमा बनविण्यास व्यस्त असलेले युवक Dainik Gomantak
गोवा

दिवाळीच्या मुहूर्तावर गोव्यात साकारणार 'नरकासूर'

यंदा वास्कोत (Vasco) नरकासूर स्पर्धा होणार की नाही यात शाशंकता असली तरी वाड्यावाड्यावर नरकासूर प्रतिमा तयार होत आहेत.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: दिवाळी (Diwali) जवळ येताच गोवेकरांना वेध लागतात ते नरकासूर बनविण्याचे. नरकासूर बनविण्यास राज्यात विविध ठिकाणी लगबग सुरू झाली आहे. दिवाळीला अवघे काही दिवस राहिल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी युवक नरकासुराच्या प्रतिमा करण्यास गुंतल्याचे दिसून आले. यामध्ये लहान मुलांचाही सहभाग होता. लोखंडी सळ्याचा साचा व लाकडी साहित्याचा (Wooden Material) वापर करुन तयार केलेले नरकासुराचे सांगाडे ठिकठिकाणी रस्त्यानजीक उभारलेले दिसत आहेत.

वास्कोतही युवक रात्र जागवून नरकासुराच्या प्रतिमा तयार करत आहेत. तरुण मुलांबरोबरच लहान मुले उत्साहाने नरकासूर करताना दिसतात. अद्याप मुलांची परीक्षा संपलेली नसल्याने त्यांचे अर्धे लक्ष नरकासूर तयार करण्याकडे लागलेले आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी मुलांनी नरकासूर तयारकरायला सुरवात केली.वास्को,बायणा,मांगूरहील,सडा,नवेवाडे,दाबोळी आदी भागात नरकासूर बनविणे जोमाने सुरू आहे.

नरकासुराचा मातीचा मुखवटा तयार करण्यासाठी देखील मुले जुंपलेली आहेत. मातीपासून मुखवटे (Masks) तयार करून त्यांना कागद चिकटवित आहेत. मातीच्या मुखवट्यांना कागद चिकटविल्यानंतर त्याला सुकायला ठेवले जात आहे. त्यानंतर त्यालारंगकाम केले जाणार असून आक्राळ विक्राळ नरकासुराचा चेहरा तयार केला जाईल. वेळेचे नियोजन लक्षात घेऊन मुले कामाला लागली आहेत.

नरकासूर करण्यासाठी प्लास्टिक (Plastic) ऐवजी गवत आणि कागद (Grass and paper) या वस्तूंचा वापर केला जात आहे. नरकासूर करताना तरुणांकडून पर्यावरणाचेही भान राखले जात असल्याचे दिसतआहे. त्यामुळे प्लास्टिक शक्य टाळण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. लहान मुले बांबूपासून लहान नरकासूर तयार करीत आहेत.

दरम्यान राज्यात पावसाचा (Rain) ओघ कमी झाल्याने नरकासुराच्या प्रति तयार करण्याला वेग आला आहे. कडक उन्हामुळे ठिकठिकाणी युवक नरकासुराच्या प्रतिमा करण्यासाठी व्यग्र आहेत. खास करून दैनदिन कार्य आटोपून रात्रीच्यावेळी युवक नरकासुराच्या प्रतिमा तयार करत आहेत. पावसाने जरी अधूनमधून हजेरी लावली तरी प्रतिमा भिजू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे.

दिवाळीत आकाशकंदील हे देखील एक वेगळे आकर्षण असते. काहीजण आकाश कंदील बाजारातून विकत आणून दिवाळीत रंगवतात, तर काहींसाठी दिवाळीतील मजा ही एकत्र येऊन छोटाच का होईना पण मिळून आकाशकंदील बनवतात. दिवाळीनिमित्त होणाऱ्या आकाशकंदील स्पर्धेसाठी (competition) काहीजणांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक कागद, माडांच्या झावळ्या, आइस्क्रिमचे चमचे, रंगीत कागद, दोरी, बाटलीचे झाकण आदी साहित्य जमविण्यास सुरूवात झाली आहे.

दरम्यान यंदा वास्कोत नरकासूर स्पर्धा होणार की नाही यात शाशंकता निर्माण झाली असली तरी वाड्यावाड्यावर नरकासूर प्रतिमा तयार करण्याकडे चालूच ठेवले आहे. मात्र वास्कोत लहान मोठ्या स्पर्धा होणार. त्याविषयी फलकही झळकलेले आहे.निवडणूक (Election) काळ असल्याने युवकांत एकप्रकारे जोश निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

Yellow Alert In Goa: हुश्श! गोव्याचा उकाडा कमी होणार; हवामान खात्याकडून पुढच्या 48 तासांसाठी पावसाचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

पाकड्यांच चाललंय काय? शाहीन आफ्रिदीनं सिकंदर रझाला गुपचूप हॉटेलमध्ये नेलं; रात्री 2 तास दोघांमध्ये... बोर्डानं ठोठावला 10 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT