डॉ. दिव्या विश्वजीत राणे Dainik Gomantak
गोवा

आश्वासने पाच वर्षांत पूर्ण करणार: दिव्या राणे

म्हाऊसच्या जाहीर सभेत मानले जनतेचे आभार

दैनिक गोमन्तक

वाळपई: निवडणुकीत प्रचंड मताधिक्य मिळाले. त्यासाठी पर्ये मतदारसंघातील मतदारांचे आपण आभारी आहे. निवडणुकीत आम्ही जी आश्वासने जनतेला दिली आहेत, ती येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्यासाठी सदोदित कार्यरत राहणार आहे. विकास हाच ध्यास आहे व त्यासाठी पर्ये मतदारसंघात सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहणार आहे, अशी ग्वाही पर्येच्या आमदार दिव्या विश्वजित राणे यांनी दिली.

म्हाऊस ग्रामपंचायत क्षेत्रात आज (शुक्रवारी) जाहीर आभार सभेत त्या बोलत होत्या. वनमंत्री विश्वजित प्र. राणे, विनोद शिंदे, म्हाऊस सरपंचच्या वंदना गावस, पंच कृष्णा गावकर, अशोक गावकर, कुंजल गावस, विठू वरक, देवस्थानाचे अध्यक्ष अनंत गावकर, पोपट गावकर, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस उपस्थिती होत्या. विनोद शिंदे यांचा पुष्पहार घालून सरपंच वंदना गावस यांनी सन्मान केला.

सत्तरी तालुका विकासमय करू

विश्वजित म्हणाले, सत्तरी तालुक्यात गेली पंधरा वर्षे राजकारणात आहे. यावेळी महत्त्वाची पाच सरकारी खाती मिळाली आहेत, त्याचा सदुपयोग करून सत्तरी तालुक्याला विकासमय तालुका म्हणून लौकीक प्राप्त करून देण्यास मी वचनबद्ध आहे. वन, आरोग्य, महिला बाल विकास, नगरनियोजन, नगरविकास यामार्फत सत्तरीच्या जनतेला योग्य तो लाभ मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT