डॉ. दिव्या विश्वजीत राणे
डॉ. दिव्या विश्वजीत राणे Dainik Gomantak
गोवा

दिव्या राणे, रेजिनाल्ड, साळकर यांनी घेतला महामंडळांचा ताबा

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्य सरकारने 12 एप्रिलला नियुक्त केलेल्या तीन महामंडळांचा ताबा (गुरुवारी) संबंधित आमदारांनी घेतला. नियुक्ती जाहीर करून 16 दिवस उलटले तरी गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचा ताबा म्हापश्याचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी अद्याप घेतलेला नाही.

पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी आज जुंता हाऊसमध्ये जाऊन वन महामंडळाचा ताबा घेतला. वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक संतोष कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. वन महामंडळाच्यावतीने राज्यातील वनांच्या संरक्षणाबरोबरच इको टुरिझम वाव देणार असल्याचे राणे यावेळी म्हणाल्या.

औद्योगिक विकास महामंडळाचा ताबा कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनीही आज घेतला. नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच सक्रिय होत महामंडळाच्या कामकाजासंबंधी माहिती जाणून घेतली. पण, आज प्रत्यक्षात त्यांनी कार्यालयात उपस्थित राहून कामकाजाला सुरवात केली.

याशिवाय दक्षिण गोवा नियोजन विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा ताबा वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी आज घेतला. गोव्याच्या सुनियोजित विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's Live Update: 24/7 फॉर 2047! मोदींचा नवीन नारा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

Mormugao Port: बिर्लाचा गोव्याला रामराम, महाराष्ट्रात हलविले कामकाज; आमदार संकल्प आमोणकरांवर गंभीर आरोप

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

SCROLL FOR NEXT