Bits Pilani Goa Dainik Gomantak
गोवा

Bits Pilani: हे 'मृत्यू' कसे झाले त्याचा निष्कर्ष काढू! 'बिट्स पिलानी' प्रकरणी चौकशी सुरू; शिक्षक, विद्यार्थ्यांशी होणार संवाद

Bits Pilani Students Death: सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित स्थापन केलेली जिल्हास्तरीय समिती बिट्सच्या पाच विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणांची चौकशी करत आहे.

Sameer Panditrao

मडगाव: सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित स्थापन केलेली जिल्हास्तरीय समिती बिट्सच्या पाच विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणांची चौकशी करत आहे.

हे मृत्यू होण्यामागे शैक्षणिक दबाव कारणीभूत आहे की अन्य काही कारणे आहेत याचेही ही समिती अवलोकन करणार, अशी माहिती दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी दिली.

एग्ना क्लीटस यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती स्थापन केली असून ही समिती आपला अहवाल तयार करून सरकारला सादर करेल, असे त्यांनी सांगितले. ही समिती मागच्या आठवड्यात भेटली होती. या चौकशीसाठी अनेक उप समित्या नेमल्या असून या समित्या बिट्समधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी बोलून माहिती जाणून घेत आहे, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थी, पालक, शिक्षक व अन्य घटकांशी संवाद

ही समिती विद्यार्थी, पालक, संस्थेचे व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्य पथकाशी वैयक्तिक मुलाखती तसेच प्रश्नावलीद्वारे संवाद साधत आहे. त्यातून आम्ही हे मृत्यू कसे झाले त्याचा निष्कर्ष काढू, असे त्यांनी सांगितले.

बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये मागच्या १० महिन्यांत पाच विद्यार्थ्यांना मृत्यू आला असून त्यापैकी तीन विद्यार्थ्यांनी परीक्षा तोंडावर आली असताना आत्महत्या केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

First AI Minister: जगातील पहिली एआय मंत्री, संसदेत केले भाषण; भ्रष्टाचाराला चाप बसविण्यासाठी अल्बानियात टेक प्रयोग Watch Video

11 गायी ठार; काणकोण - कारवार महामार्गावर पहाटेच्या सुमारास झाला भीषण अपघात

भोपाळ ते गोवा जाणाऱ्या बसमध्ये सुरु होता अजब प्रकार; RTO अधिकाऱ्यांनी प्रवासी बनवून केला भांडाफोड

Goa Live Updates: डॉ. गावडे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे

Bicholim: डिचोलीतील निवासी इमारत मोजतेय अखेरच्या घटका! अनैतिक धंद्यांसाठी वापर; वीज खात्याकडून बांधकामाचा प्रस्ताव रेंगाळला

SCROLL FOR NEXT