Goa Beach Shack Dainik 'Gomantak
गोवा

Goa Beach Shack: शॅक्सचे सरसकट वितरण करा; अनुभवानुसार नको

Goa Beach Shack: व्यवसाय इच्छुकांची खंडपीठात याचिका

दैनिक गोमन्तक

Goa Beach Shack: गोवा सरकारने पुढील तीन वर्षासाठी अधिसूचित केलेल्या शॅक धोरणातील वर्गीकरणाला काही इच्छुक शॅकधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे.

अनुभवानुसार या शॅकचे वर्गीकरण केल्याने अनेकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे अनुभवानुसार हे शॅक वर्गीकरण न करता सरसकट त्याचे वितरण करण्याचे निर्देश द्यावेत,अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

या याचिकेचा आज खंडपीठासमोर करण्यात आल्यावर त्यावरील सुनावणी सोमवारपर्यंत (३० ऑक्टोबर) तहकूब करण्यात आली आहे.

मुरगाव येथील शितल परब यांच्यासह पाचजणांनी ही याचिका सादर केली आहे. त्यामध्ये राज्य सरकारसह पर्यटन खात्याला प्रतिवादी करण्यात आले आहे.

राज्यातील किनारपट्टीवर हंगामी शॅक उभारण्यासाठी तीन वर्षासाठी पर्यटन खात्याने शॅक धोरण अधिसूचित केले आहे. या धोरणातील क्लॉज 9 ला याचिकादारांनी आव्हान दिले आहे.

धोरणातील क्लॉज 9 नुसार 10टक्के शॅक वितरण अननुभवी अर्जदाराना, 10 टक्के शॅक 1 ते 4 वर्षे अनुभव असलेल्यांना तर 80 टक्के 5 वर्षे व त्यावरील अनुभव असलेल्यांना सोडत पद्धतीने देण्यात येणार आहे.

या वितरणासाठी अर्जदाराकडे असलेल्या अनुभवाचा विचार करण्यात येणार असला तरी गेली अनेक वर्षे शॅकचा व्यवसाय करत असलेल्यांवर अन्याय होणार आहे.

दरवर्षी 1 ते 4 वर्षे अनुभव असलेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे, त्यामुळे त्याचा परिणाम या वर्गीकरणात अर्ज करणाऱ्यांवर होणार आहे.

त्यामुळे हा अनुभवच रद्द करून सरसकट सोडत पद्धतीने सर्व शॅकचे वितरण करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

मागील शॅक धोरण हे 2019 ते 22 या तीन वर्षासाठी होते. मात्र, कोविडमुळे अनेक शॅक चालकांना त्याचा मोठा फटका बसला. त्यामुळे आणखी एक वर्ष वाढवून देण्यात आले होते.

हे शॅक धोरण त्या त्‍या किनारपट्टी भागातील या शॅक व्यवसायातील कुटुंबातील बेरोजगारांनी अर्ज करावा,यासाठी असल्याचा उद्देश पर्यटन खात्याने स्पष्ट केला होता. मात्र आता अनुभवी शॅक चालकांची मनमानी झाली आहे.

धोरणात नमूद पात्रता तर्कहीन; अवास्तव

या धोरणात शॅक परवान्यासाठी नमूद केलेली पात्रता अनियंत्रित, तर्कहीन, अवास्तव आणि भारतीय घटनेतील अनुच्छेद 14 तसेच अनुच्छेद 19 (1)(जी) व 21 चे उल्लंघन करणारी आहे.

त्यामुळे हे शॅक वितरण अनुभवाच्या आधारे न करता ते सरसकट करावे,असे निर्देश द्यावेत व वर्गीकरणाची पद्धत रद्द करावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT