Protest Dainik Gomantak 
गोवा

गोव्यात कंत्राटी परिचारिकांची सेवा खंडित

आरोग्य संचालक डॉ. गीता काकोडकर यांच्याकडे सेवा मुदतवाढ करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात कोविड महामारीच्या काळात कंत्राटी पद्धतीवर नेमणूक केलेल्या परिचारिकांची सेवा मुदत संपली त्यात वाढ करण्यात यावी. सेवेत कायम करण्यात येईपर्यंत त्यांच्या कंत्राटाचे नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी 31 परिचारिकांनी नवनिर्वाचित आरोग्य संचालक डॉ. गीता काकोडकर यांची भेट घेऊन केली. त्यांनी कंत्राटाची मुदत वाढवण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती परिचारिकांना दिली.

कोविड महामारीच्या काळात सरकारने कंत्राटी पद्धतीवर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या परिचारिकांना दोन वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त केले होते. त्यांचा हा कालावधी संपल्याने त्यांची सेवा खंडित झाली आहे. ही सेवा त्यांना कायम सेवेत करण्यात येईपर्यंत सुरूच ठेवण्यात यावी या मागणीसाठी त्या आरोग्य संचालनालयासमोर एकत्रित झाल्या व त्यांनी त्यांची मागणी संचालकांसमोर सादर केली. सरकारने या परिचारिकांचा खात्यातील रिक्त पदांसाठी प्राधान्याने विचार केला जाईल असे आश्‍वासन दिले होते. मात्र, हल्लीच खात्यामध्ये भरण्यात आलेल्या परिचारिकांच्या पदासाठी काही विशिष्ट तालुक्यातीलच कंत्राटी पद्धतीवरील परिचारिकांना सेवेत कायम करून घेण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत कंत्राटीवरील परिचारिकांच्या वेतनात वाढ करण्यात आलेली नाही. त्यांना प्रतिदिन 800 रुपये याप्रमाणे वेतन दिले जावे. त्यांना भविष्यनिर्वाह निधी तसेच दरवर्षीची वाढ हे लागू करण्यात यावे. कोविड काळात जीव धोक्यात घालून रुग्णांना सेवा देण्यात आली. त्यामुळे परिचारिकांना केलेल्या सेवेची दखल सरकारने घ्यावी. कायम सेवेत घेताना सरकारने एखाद्या विशिष्ट तालुक्यातीलच उमेदवारांना नियुक्त न करता सर्व तालुक्यातील उमेदवारांना समान न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘सरकारने प्रस्ताव मंजूर केल्यास त्वरित कार्यवाही’

कंत्राटी पद्धतीवर सरकारने परिचारिकांची नेमणूक केली होती. त्यांची सेवामुदत संपल्याने कंत्राट वाढवण्याचा प्रस्ताव सरकारला पाठविला आहे. कंत्राटचे नुतनीकरण करण्याचा निर्णय सरकारचा आहे. सध्या तरी खात्यात परिचारिकाच्या जागा रिक्त नाहीत. या परिचारिकांच्या सेवेच्या कंत्राटात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारने मंजूर केल्यावर त्याची त्वरित कार्यवाही केली जाईल अशी माहिती आरोग्य संचालक डॉ. गीता काकोडकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT