12 आमदारांविरुद्धची अपात्रता याचिका पुन्हा तहकूब Dainik Gomantak
गोवा

12 आमदारांविरुद्धची अपात्रता याचिका पुन्हा तहकूब

12 आमदारांविरुद्धची अपात्रता याचिकेची सुनावणी येत्या 20 डिसेंबरला

दैनिक गोमन्तक

काँग्रेस (Congress) व मगो पक्षातून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेल्या 12 आमदारा विरुद्धची आमदार अपात्रता याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीठाने पुन्हा तहकूब करून ती आता येत्या 20 डिसेंबरला सुनावणीसाठी ठेवली आहे.

दरम्यान, भाजपमध्ये गेलेल्या कॉंग्रेसच्या 10 आणि मगोच्या 2 आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर निवाडा देत असताना सभापतींनी फेटाळल्याने त्या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यघटनेच्या परिशिष्ट 10 नुसार एखाद्या विधिमंडळातील दोन तृतियांश आमदार फुटुन दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे सक्तीचे आहे. मात्र गोव्यात असे घडले नाही. दोन तृतियांश आमदार फुटुन गेले असले तरी, कॉंग्रेसचे अजनूही विलीनकरण झालेले नाही. त्यामुळे सभापतींनी दिलेला निवाडा हा बेकायदेशीर असल्याचा युक्तीवाद कॉंग्रेसचे जेष्ठ वकील विवेक तांका यांनी मागील सुनावणीच्यावेळी म्हटले होते.

शिवाय, काँग्रेस पक्षाच्या याचिकेत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स, मंत्री जेनिफर मोन्सेरात, आमदार बाबूश मोन्सेरात, आमदार क्लाफासिओ डायस, आमदार विल्फ्रेड डिसा, आमदार टोनी फर्नांडिस, आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, आमदार नीळकंठ हळर्णकर, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, तर मगोतर्फे दाखल केलेल्या याचिकेत मंत्री दीपक पाऊस्कर, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT