Goa Political News Dainik Gomantak
गोवा

Goa Political News: भाजपच्या उमेदवारीवर दिल्लीमध्ये खल सुरू! मुख्यमंत्री दिल्लीला रवाना

पहिली यादी आज शक्य

दैनिक गोमन्तक

Goa Political News

लोकसभेचे भाजपचे उमेदवार ठरविण्यासाठीच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आज (गुरुवारी) दुपारी सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री आज अशा बैठकीत सहभागी होऊन सायंकाळी गोव्यात आले; पण ते पुन्हा पहाटे दिल्लीला रवाना होणार आहेत. वेगवान घडामोडी पाहता, भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

‘जिंकण्याची क्षमता’

भाजपच्या संसदीय मंडळाने उमेदवारीविषयी निर्णय घेण्याआधी प्रदेश पातळीवरून दिल्लीत पाठविलेल्या संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे. आजही (बुधवारी) तशी चर्चा झाली. ‘जिंकण्याची क्षमता’, हाच निकष आहे.

उत्तर गोव्यातून विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह माजी आमदार दयानंद सोपटे, माजी मंत्री दिलीप परूळेकर आणि दयानंद मांद्रेकर यांच्या नावाचा तर दक्षिण गोव्यातून माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, सभापती रमेश तवडकर आणि आमदार दिगंबर कामत यांच्या नावाची चर्चा आहे.

भाजप राष्ट्रीय पातळीवर उमेदवार निवडीवेळी वेगळा विचार करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याखेपेस दोन्ही ठिकाणचे उमेदवार बदलले जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT