Nuvem Panchayat  Dainik Gomantak
गोवा

Nuvem Panchayat on Garbage: मासिक 50 रूपये कचरा शुल्क आकारण्‍याचा नुवे ग्रामसभेत निर्णय

साळ नदीला पुनर्वैभव प्राप्‍त करून देणार!

दैनिक गोमन्तक डिजिटल

Nuvem Panchayat on Garbage: नुवेतील लोकांना आता मासिक 50 रुपये कचरा शुल्क पंचायतीले द्यावे लागणार आहे. यात सुक्‍या व ओल्‍या कचऱ्यासाठी प्रत्‍येकी 25 रुपये असतील. नुवेच्या सरपंच फ्रिडा डिसा यांनी ग्रामसभेत तशी घोषणाह केली.

महिन्यातून तीन वेळा पंचायत सुका कचरा गोळा करते. त्यामुळे प्रत्येक घराकडून घेतले जाणारे 100 रुपये शुल्क आकारले जाणार नाही, असेही त्‍यांनी स्पष्ट केले.

या ग्रामसभेत अन्‍य विषयांवरही चर्चा करण्यात आली. स्थलांतरित लोकांचे सर्व्हेक्षण व त्यांच्याकडून कचरा शुल्क वसूल करण्यासाठी प्रतिनिधी नियुक्त करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.

पंचायत क्षेत्रातील जाहिरात फलकांचेही सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मोबाईल टॉवरना विरोध करणारा ठराव मंजूर करण्यात आला.

साळ नदीला पुनर्वैभव प्राप्‍त करून देणार!

ओर्ली ग्रामसभेत साळ नदीची स्‍वच्‍छता करून तिला पुनर्वैभव प्राप्‍त करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय रेल्वे दुपदरीकरणाला विरोध दर्शविणारा ठराव मंजूर करण्यात आला.

साळ नदीच्या परिसरात सिवरेज प्रक्रिया प्लांट, हॉटेल्‍स व इतर औद्योगिक आस्थापने असल्याने या नदीचे पाणी दूषित होत असल्याचा मुद्दा ग्रामस्‍थांनी उपस्थित केला.

तसेच नदीच्या दोन्ही बाजूंच्‍या किनाऱ्यांवर वाढत्‍या बांधकामांमुळेही नदीचे सौंदर्य व नैसर्गिकपणा लोप पावत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. या ग्रामसभेचे अध्यक्षपद सरपंच सायमन परेरा यांनी भूषविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT