Goa Jobs Scam Dainik Gomantak
गोवा

संस्कृती खात्याच्या निवडप्रकीयेत वशिलेबाजी!

निवड समितीने निवडलेल्या बऱ्याच उमेदवारांना डावलून वशिल्याचे टट्टू तिथे भरती केल्याचे उघड झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: कला व संस्कृती खात्यात 2019 मध्ये संगीत प्रशिक्षक व संगीत साथीदार या पदांसाठी मुलाखती (Interview) घेऊन ती पदे अगदी अलीकडे भरली गेली आहेत. निवड समितीने निवडलेल्या बऱ्याच उमेदवारांना डावलून वशिल्याचे टट्टू तिथे भरती केल्याचे उघड झाले असून काही उमेदवार माहिती हक्क कायद्याखाली त्यासंदर्भात माहिती मागवत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या उमेदवारांची निवड करण्यासाठी कला अकादमीच्या (Kala Academy) हिंदुस्थानी संगीत विभागातीलच शिक्षकांची निवड समितीवर नेमणूक केली होती. कारण या खात्याचे मंत्री कला अकादमीचेही अध्यक्ष आहेत. त्यामुळे आपल्या मर्जीप्रमाणे काही उमेदवारांना वशिल्याने घेताना अडचण येणार नाही, याची त्यांना खात्री होती. त्याप्रमाणे मंत्री महोदयानी निवड समितीवरील त्या संगीत शिक्षकांपैकी एकेकट्याला मंत्रालयातील केबिनमध्ये बोलावून निकालात फरक करायला भाग पाडले, असे समजल्याचे ज्येष्ठ कलाकार मुरारी कांदोळकर यांनी सांगितले.

राज्य सांस्कृतिक पुरस्कारात झालेल्या वशिलेबाजीमुळे अनेक कलाकार, साहित्यिक खवळले आहेत. कला अकादमीच्या हिंदुस्थानी संगीत विभागात तबला साथीदारांची पदे भरताना अशीच वशिलेबाजी करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्या पदासाठी एका तबलावादक युवतीची निवड झाली असताना तिला डावलून शास्त्रीय गायन (Classical Music) वादनाला साथ कशी करतात, याचा गंधही नसलेल्या ताळगाव येथील एका नवख्या वादकाची निवड करायला निवड समितीवरील कलाकाराला भाग पाडले, हे आता लपून राहिलेले नाही, असेही कांदोळकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

Goa Politics: 'आरजी'कडून निलंबित खोलकरांना चौकशीसाठी नोटीस; 7 ऑगस्‍टला हजर राहण्‍याचे निर्देश

SCROLL FOR NEXT