Goa Public Service Commission  Dainik Gomantak
गोवा

गोवा लोकसेवा आयोग: दिव्यांगाच्या जागी दुसरीच व्यक्ती

गोवा लोकसेवा आयोगाच्या भरतीला दिव्यांग संघटनेचा आक्षेप

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा लोकसेवा आयोगाने (GPSC) दंत वैद्यकीय महाविद्यालयात दोन जागा भरताना आरक्षण पाळले गेले नसल्याचा आरोप होऊ लागला आहे. दिव्यांगासाठी (कर्णबधिर) जागा असताना ती जागा सर्वसाधारण गटातून भरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या भरतीला दिव्यांग संघटनेने आक्षेप घेतला आहे.

दंत वैद्यकीय महाविद्यालयात कन्झर्वेटीव्ह डेंट्रीस्ट्री आणि एन्डोडॉन्टीक्स या पदांसाठी आयोगाने एकूण 5 जागांसाठी अर्ज मागवले होते. त्यातील तीन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी, एक जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी), तर एक जागा दिव्यांगातून (कर्णबधिर) भरण्यात येईल असे जाहिरातीत नमूद केले होते. सर्वसाधारण प्रवर्गाच्या तीन जागा भरल्या.

मात्र, नंतर कर्णबधिर उमेदवार मिळत नसल्याने सर्वसाधारण गटातील चौथा क्रमांक प्राप्त एका उमेदवारास मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात आले. सर्वसाधारपणे आरक्षित पद खुले करायचे असल्यास त्या पदासाठी तीन वेळा जाहिरात दिली जाते. मात्र, या बाबतीत तसे न करता दोनवेळा जाहिरात देऊन ते पद सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दरम्यान, विकलांग (दिव्यांग) संघटना (ड्रॅग) गोवाचे अध्यक्ष अवेलीनो डिसा यांच्या कानावर ही गोष्ट पडल्यानंतर त्यांनी या नियुक्तीला तीव्र आक्षेप घेतला असून सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्तीची निवड रद्द करून त्या जागी दिव्यांग कर्णबधिर व्यक्तीला घ्यावे. त्यासाठी हवी तर नव्याने जाहिरात द्यावी. आपल्या संघटनेला विश्‍वासात घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सात दिवसांची मुदत

दंत महाविद्यालयातील लेक्चर जागा ही दिव्यांगासाठी (कर्णबधिर) आहे. त्यामुळे गोवा लोकसेवा आयोगाने इतर व्यक्तीची त्याजागी केलेली नियुक्ती सात दिवसांत रद्द करावी. अशी मागणी आम्ही गोवा लोकसेवा आयोगाच्या सदस्य सचिवांना व दंत महाविद्यालयाच्या डीनना लिखित स्वरूपात केली आहे. या सात दिवसांच्या मुदतीत ती नियुक्ती रद्द झाली नाही, तर आपली संघटना दिव्यांग कल्याण आयोगाकडे तक्रार करणार आहे.

- आवेलिनो डिसा (विकलांग (दिव्यांग) संघटना गोवाचे अध्यक्ष)

ही पद भरती नियमानुसारच आहे. जाहिरातीत कुठेही ही पदे त्याच प्रवर्गातून भरण्यात येतील अन्यथा भरली जाणार नाहीत असे म्हटले नव्हते. एखाद्या प्रवर्गातून उमेदवार आला नाही, तर सर्वसाधारण गटाला संधी दिली जाते. याही बाबतीत तेच केले गेले आहे.

- यतींद्र मराळकर, सचिव,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT