Goa Government | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News : सरकारी कर्मचाऱ्यांना महिला व बालविकास संचालनालयाचा दणका; 68 लाख वसूल

दीड लाखहून अधिक महिला लाभार्थी

दैनिक गोमन्तक डिजिटल

सरकारी सेवेत असूनही काही सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंब सदस्यांसाठी गृहआधार योजनेचा लाभ घेतला. मात्र, अशा सरकारी कर्मचाऱ्यांना महिला व बालविकास संचालनालयाकडून दणका देण्यात आला आहे.

ज्यांनी या योजनेसाठी अपात्र असूनदेखील लाभ घेतला त्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या वर्षभरात 68 लाख 326 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. गृहआधार योजनेचा गैरफायदा घेतलेल्या 80 कर्मचाऱ्यांची पूर्णपणे वसुली करण्यात आली आहे.

गरीब महिलांच्या कुटुंबासाठी आधार

गोरगरीब महिलांच्या कुटुंबाला ‘गृहआधार योजना’ ही योजना आधार देते. अनेक महिला आपल्या कुटुंबीयांचे संगोपन या योजनेतून मिळणाऱ्या मानधनावर करत असतात. राज्यातील 1 लाख 70 हजार 468 महिलांना या योजनेचा लाभ प्राप्त होणे म्हणजेच तेवढ्या कुटुंबीयांना अल्प प्रमाणात का होईना आधार देणे या योजनेतून घडत आहे.

गृहआधारबाबत माहिती

गृहआधार मंजूर महिलांची संख्या- 1,70,468

पडताळणीनंतर रद्द अर्जांची संख्या- 22,305

विचाराधीन किंबा प्रलंबित अर्जांची संख्या - 12,174

सरकारी कर्माचाऱ्यांकडून वसूल केलेली रक्कम - 68 लाख 326 रु.

पूर्णपणे रक्कम वसुली केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या - 80

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT